Akola News: अकोल्यात टरबूजावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, डोळ्यात अश्रू

Crop Disease Alert: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील टरबूज शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा टरबूज आणि खरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
Akola News: अकोल्यात टरबूजावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, डोळ्यात अश्रू
Published On

अक्षय गवळी/साम टीव्ही न्यूज

टरबूज उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातील बातमी समोर आली आहे. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातला टरबूज उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा टरबूज आणि खरबूज पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं टरबूज पिक हातातून निघून गेलंय. काही शेतात टरबूज चक्क पपई सारखे हुबेहूब दिसू लागले. हे टरबूज पिक पिवळं पडल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे.

या भागात टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

तेल्हारा तालुक्यातल्या दानापूर, हिंगणी, हिवरखेड, तळेगाव, झरी, सौंदळा, वारखेड आणि कारला गावासह अनेक भागात टरबूज पिकावर अज्ञात रोगाचा मोठा प्रादुर्भाव झालाय. शेकडो शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय. हेक्टरीनुसार 1 लाख रुपये खर्च टरबूज लागवडीसाठी केलाय. परंतु आता खर्च निघणही शेतकऱ्यांसमोर कठीण झालंये. त्यामुळ सरकारनं तातडीने नुकसानाचे पंचनामे करून टरबूज पिकाला विमा कवच द्यावे, अशी मागणी दानापूर येथील शेतकरी सुभाष रौदंळे यांनी केलीये.

Akola News: अकोल्यात टरबूजावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, डोळ्यात अश्रू
TB: टीबी झाल्यावर शरीरात काय गंभीर लक्षणे कशी दिसतात? जाणून घ्या

अक्षरशः संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतातलं टरबूज पीक उखळून फेकले.

तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या टरबुजाच्या लागवडीतूनही शेतकऱ्यांना मोठा नफा मिळतो. पण, यंदा टरबूज पिकावर अज्ञात रोग आला अन चक्क हिरवे दिसणारे टरबूज काही दिवसातच पूर्णतः पिवळे पडले. यासाठी शेतकऱ्यांनी किडनाशकांच्या फवारण्या, तसेच खत नियोजन केले खरी, परंतु त्याचा काहीही फायदा होतांना दिसत नाहीये. कृषी विभागाला तक्रारी केल्या मात्र अद्यापही कोणीही डोकावून सुद्धा पाहलं नाही. अखेर वैतागून शेतकऱ्यांनी हतबल होत शेतातलं टरबूज जनावरांसमोर खायला टाकलंये. तर काही शेतकऱ्यांनी टरबूज पिक जमिनीतून उखळून रस्त्यावर फेकले.

Akola News: अकोल्यात टरबूजावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, डोळ्यात अश्रू
Cholesterol Tips: कोलेस्ट्रॉल वाढतोय? नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' टिप्स करा फॉलो

अज्ञात रोगामुळे टरबूज पिकावरील लक्षणे पुढीलप्रमाणे

- अज्ञात रोगामुळे टरबुजाची वाढ थांबली.

- अनेक ठिकाणी टरबुजाच्या वेली अक्षरशः जळल्या.

- काही शेतकऱ्यांच्या शेतात टरबुजाच्या वेली वाढवण्याअगोदरच पूर्णतः जळाल्या.

- महत्वाचं, हिरवी दिसणारे टरबूज लवकरच पिवळे पडते.

- चक्क टरबूज पपई सारखं हुबेहूब दिसू लागतं..

- टरबूज फळातील गोडावा गायब होता.

Akola News: अकोल्यात टरबूजावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, डोळ्यात अश्रू
Badlapur News: हॉलमार्क चिन्ह नसलेल्या सोन्याची विक्री; बदलापुरातील ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेची धाड

इथल्या शेतकऱ्यांचे अशी आहे व्यथा

तेल्हारा तालुका हा बागायतदार असून इथे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टरबूज आणि खरबुजाची लागवड केली. मात्र, वातावरण बदलाचा या पिकांवर मोठा फटका बसलाय. रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टरबूज आणि खरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, दानापूर येथील शेतकरी सुभाष रौंदळे सांगतात की त्यांनी दहा एकरात टरबूज पिकाची लागवड केली होती. हेक्टरी नुसार एक लाख रुपये इतका खर्च लागवडीसाठी लागला. अनेक औषधी फवारणीसह उपाययोजना केल्या, मात्र एकही रुपयाचे उत्पन्न हातात आलं नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com