Badlapur News: हॉलमार्क चिन्ह नसलेल्या सोन्याची विक्री; बदलापुरातील ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेची धाड

Badlapur: बदलापुरातील शिरगाव परिसरात असलेल्या जय भवानी ज्वेलर्सवर बीआयएसने धाड टाकून ४८ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. नव्या नियमांनुसार HUID क्रमांक नसल्यानं ही कारवाई करण्यात आली.
Badlapur News: हॉलमार्क चिन्ह नसलेल्या सोन्याची विक्री; बदलापुरातील ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेची धाड
Published On

मयूरेश कडव/साम टीव्ही न्यूज

बदलापुरातील शिरगाव परिसरात स्थित जय भवानी ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेने धाड टाकली असून, त्यात ४८ ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्यांवर HUID क्रमांक नसल्यामुळे बीआयएस अधिकारी नेहमीच्या नियमांची अंमलबजावणी करत आहेत. त्याच वेळी, २०० ग्रॅम सोनं दुकानातच सील करून ठेवण्यात आलं आहे.

बीआयएसच्या नवीन नियमांनुसार, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क चिन्हासोबतच एक युनिक HUID (हॉलमार्क युनिक आयडी) क्रमांक असावा लागतो. परंतु, जय भवानी ज्वेलर्समध्ये असे क्रमांक नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीआयएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानात जुन्या हॉलमार्क असलेले २५० ग्रॅम सोनं आढळून आले, परंतु त्यावर HUID क्रमांकाचा अभाव होता. त्यामुळे, ४८ ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले, तर बाकीचं २०० ग्रॅम सोनं दुकानात सील करून ठेवण्यात आलं.

Badlapur News: हॉलमार्क चिन्ह नसलेल्या सोन्याची विक्री; बदलापुरातील ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेची धाड
Tourism Fraud: लोणावळा-कर्जत व्हिला बुकिंग घोटाळा; ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश, आरोपी पुण्यात गजाआड

बीआयएसच्या कारवाईनंतर सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आल्या की जय भवानी ज्वेलर्समध्ये खोटं सोनं आढळलं आहे. मात्र, ज्वेलर्स असोसिएशनने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, दुकानात मिळालेलं सोनं खरे होते आणि त्यावर जुन्या हॉलमार्क नियमानुसार शिक्का देखील होता.

Badlapur News: हॉलमार्क चिन्ह नसलेल्या सोन्याची विक्री; बदलापुरातील ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेची धाड
Electricity Shock: विद्युत फिडर बंद करताना तरुणाची चूक, ११ हजार वोल्ट वायरला लटकला अन् जीव गेला

केवळ नव्या नियमांनुसार HUID क्रमांकाचा अभाव होता, ज्यामुळे बीआयएसने कारवाई केली. ज्वेलर्स असोसिएशनने या अफवांच्या विरोधात सोशल मीडियावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी बदलापूर पूर्व पोलिसांना निवेदन देऊन अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Badlapur News: हॉलमार्क चिन्ह नसलेल्या सोन्याची विक्री; बदलापुरातील ज्वेलर्सवर बीआयएस संस्थेची धाड
Travel: मसूरीपासून ७ किमी अंतरावर आहे लपलंय 'मिनी लंडन', तुम्ही कधी येथे भेट दिली आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com