Dhanshri Shintre
उन्हाळ्यात कमी गर्दी असलेले शांत आणि निसर्गरम्य हिल स्टेशन शोधत आहात का? मग हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
या ठिकाणाच्या नैसर्गिक सौंदर्याने तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल, एकदा भेट दिल्यावर पुन्हा यावेसे वाटेल.
ब्रिटीश काळात बांधलेले हे ठिकाण शांतता आणि विश्रांतीसाठी हे ठिकाण खास आहे. इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम येथे पाहायला मिळतो.
मसूरीपासून अवघ्या ७ किमी अंतरावर वसलेले लँडोर हे निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
लँडोर हे निसर्गरम्य, शांत आणि अनवट स्थळ असून येथे सौंदर्य, शांततेचा अनोखा मिलाफ अनुभवता येतो.
लँडोरने अनेक दशकांपासून आपले निसर्गसौंदर्य आणि घनदाट वनराई संरक्षित ठेवली असून, आजही ते निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे स्थान आहे.
स्वातंत्र्याच्या काळात लँडोरमध्ये जशी २४ घरे होती, तशीच ती आजही कायम असून येथील शांतता अद्याप अबाधित आहे.
लँडोरसाठी सर्वात जवळचे विमानतळ डेहराडून येथील जॉली ग्रँट विमानतळ असून, तेथून लँडोरला सहज पोहोचता येते.खर्च कमी, आनंद भारी; खिशाला परवडणारी फिरा महानगरी