Vishal Gangurde
मुंबईत अनेक पर्यटन स्थळे आहेत. मुंबईतील काही ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
मुंबईतील कानाकोपऱ्यात अनेक पर्यटक स्थळे आहेत. या ठिकाणी दररोज पर्यटक हजेरी लावत असतात.
मुंबईला समुद्राने वेढलं आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर भेलपुरी, सेवपुरी असे नानाविविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
हाजी अली मुंबईतील प्रसिद्ध दर्गा आणि मशिद आहे. मुस्लीम व्यापारी सैय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांची ही कबर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन हे मुंबईचं आयकॉन आहे. आधी या स्टेशनचं नाव विक्टोरिया टर्मिनस होतं.
मुंबईच्या वांद्रे येथे जॉगर्स पार्क आहे. जॉगर्स पार्कमध्ये देशाच्या पहिल्या लॉफिंग क्बल सुरुवात झाली.
चर्चगेट स्टेशनजवळ मरीन ड्राईव्ह आहे. मरीन ड्राईव्हला राणीचा नेकलेस देखील म्हणतात.
मुंबईच्या मध्यभागी असलेल्या भायखळा येथे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आहे. तेथे शेकडो प्राण्यांचे वास्तव्य आहे.