Southwest Monsoon 2025 Withdraws From Mumbai : छत्र्या, रेनकोट आता पुन्हा गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. कारण, मान्सूनने मुंबईतून एक्झिट घेतली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातूनही गायब होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात उघडीप पडणार असून सामान्य वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासह मराठवाडा अन् विदर्भाला झोडपून काढल्यानंतर परतीच्या पावसाने माघार घेतली आहे. मुंबईमधून मान्सूनच्या परतीची तारीख सहा ऑक्टोबर होती. पण खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून अपेक्षापेक्षा उशिराने माघारी परतला. मंगळवारपासून मुंबईमध्ये पावसाने उघडीप घेतली आहे.
(Monsoon Withdraws from Mumbai, To Exit Maharashtra in 3 Days )
मुंबई आणि उपनगरातून मान्सूनने माघार घेतल्याची माहिती हवामान विभागाकडून शुक्रवारी जारी करण्यात आली. पुढील तीन दिवसात मान्सून संपूर्ण राज्यातून एक्झिट घेणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांघण्यात आले आहे. पाच अथवा सहा तारखेला मान्सून राज्यातून माघार घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आठवडाभराच्या उशीराने मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. शुक्रवारी मान्सूनने गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून एक्झिट घेतल्याचे IMD कडून जाहीर करण्यात आलेय. अंदाजित वेळेपेक्षा मान्सूनने मुंबईतून उशिरा काढता पाय घेतला असला तरी सात वर्षांतील ही सर्वात लवकर माघार आहे. तर २००६ नंतर २० वर्षातील ही दुसऱ्यांदा सर्वात लवकर माघार आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. मुंबईतून मान्सूनच्या एक्झिटची सामान्य तारीख ८ होती. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हजरे लावली. मंगळवारपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली. शुक्रवारी पावसाने मुंबईतून काढता पाय घेतला. मागील सात वर्षातील ही सर्वात लवकर माघार ठरली आहे. २०२४ मध्ये १५ ऑक्टोबरला मान्सूनने मुंबईतून माघार घेतली होती. २०२३ आणि २०२२ मध्ये मान्सून दोन आठवड्यापेक्षा जास्त उशिराने मान्सून माघारी परतला होता.
यंदा मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईतही वादळी वाऱ्यासह धो धो पाऊस कोसळला. १९५० नंतर पहिल्यांदाच मान्सूनची सर्वात लवकर सुरूवात झाली होती. जून ते सप्टेंबर, या चार महिन्यात राज्यात धो धो पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी मान्सून मुंबईतून माघारी परतलाय. दोन दिवसांत राज्यातून मान्सून माघारी परतेल, असा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सध्या मान्सून अलिबागपर्यंत माघारी परतलाय. पुढील दोन-तीन दिवसात राज्यातून मान्सून एक्झिट होईल. कोकण, मध्य महाराष्ट्राला परतीचा पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य माहाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर उर्वरित राज्यात हवामान स्वच्छ राहील, असे आयएमडीकडून सांगण्यात आलेय. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आळी आहे. तर उर्वरित राज्यात पुढील चार दिवस राज्यात उघडीप असेल, असे हवामान विभागाने सांगितलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.