Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : "...तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही; CM शिंदेही आमदार म्हणून अपात्र ठरतील"

सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे सर्व काही संविधान, कायद्याने घडले तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. स्वतः मुख्यमंत्रीच आमदार म्हणून अपात्र ठरतील, असं सामनातून मांडण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

'शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिंदे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेना आणि फुटीर मिंधे गटाचा निवडणूक आयोगात खटला सुरू आहे. तेथे आता कोणी ‘शेषन’ महाशय नसल्यामुळे बेइमानांचे फावले आहे इतकेच. सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे सर्व काही संविधान, कायद्याने घडले तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. स्वतः मुख्यमंत्रीच आमदार म्हणून अपात्र ठरतील, असं सामनातून मांडण्यात आलं आहे. (Maharashtra Political News)

त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा वापर मनमर्जीने करून बेइमानांना वाचवले जात आहे. तरीही बेइमानी फार काळ टिकेल असे दिसत नाही. श्री. फडणवीस (Devendra Fadnavis) हे किती काळ महाराष्ट्रात ‘डेप्युटी’ म्हणजे ‘उप’ राहणार? कालपर्यंत ते राज्याचे ‘मुख्य’ होते, बाकी सारे त्यांचे डेप्युटी होते. आज फडणवीस त्याच डेप्युटीच्या हाताखाली काम करीत आहेत व बावनकुळे वगैरेंना हे मान्य नाही, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

'नागपुरात फटाकाच फुटला, बावनकुळे खरे बोलले'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावरूनही सामनातून चिमटे काढण्यात आले आहेत.नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच’. याचा अर्थ स्पष्टच की, मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे व फडणवीस वगैरे लोक सरकार व शिंद्यांच्या बाजूने लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

'बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात. मग इतके मोठे विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय? हाच प्रश्न आहे. नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या (Eknath Shinde) पाठीला चटका बसला आहे. फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल. महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था डामाडौल आहे. बावनकुळे यांनी तसा फटाकाच फोडला आहे. भाजपच्या मनावरील दगड दूर करण्याचे काम सुरू झाले आहे, असा दावा सुद्धा सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

'फडणवीस यांचा हक्क असताना शिंद्यांना मुख्यमंत्री करणं ही तडजोड होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यासाठी कोट चढवलाच होता, पण दिल्लीच्या आदेशाने होत्याचे नव्हते झाले. फडणवीसांनी शिंदे गटाच्या हाताखाली काम करणे म्हणजे सिंहाने कोल्हय़ांच्या झुंडीचे ‘राज्यपद’ मान्य करण्यासारखे आहे. याची टोचणी फडणवीस यांच्या मनास असणारच'.

'दुसरे असे की, शिंद्यांबरोबर 50 लोक गेले हा भ्रम आहे. त्यांच्याबरोबर फार तर सात-आठच आमदार गेले. बाकीच्यांना फडणवीस यांनीच फितवून, धमकावून पाठवले असे म्हणतात. त्या कामी केंद्रीय तपास यंत्रणा, प्रलोभने, खोके वगैरेंचा वापर झाला. फडणवीस यांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण घोडय़ावर टपकन जाऊन बसले दुसरेच कोणी', असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT