Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची सुषमा अंधारेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून ठाकरे गटावर टीका; म्हणाले...

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप नेत्यांकडून ठाकरे गटावर टीका केली जात आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News Saam Tv
Published On

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजप नेत्यांकडून ठाकरे गटावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 'ज्यांनी खिल्ली उडवली, त्याच लोकांना मंचावर घेऊन मोर्चा काढला जातो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis News
Jayant Patil : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील वादग्रस्त ट्विट कोणी केले? जयंत पाटलांनी थेट इलॉन मस्क यांनाच केला सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टीका करताना म्हणाले, 'विरोधी पक्षातील नेते केवळ निव्वळ राजकारण करताना दिसतात. आज महापुरुष यांच्या अपमानाबाबत नारे देत होते. आमच्यासाठी महापुरूष कालही आदर्श होते आणि आजही होते. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांना पुरावे मागण्याची हिंमत होते, ते आज घोषणा देत आहेत'.

'आपल्या सोयीचे नाही तर गप्प बसू असा दुटप्पी भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. जे पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात, त्या पक्षाचे नेते आमच्या वारकरी लोकांबाबत बोलतात. राज्याचे जे वैभव आहे, ते इथल्या संतानी आणि वारकऱ्यांनी निर्माण केलेले आहे. ज्यांनी खिल्ली उडवली त्याच लोकांना मंचावर घेऊन मोर्चा काढला जातो. सात पक्ष एकत्र आले तरी 15 ते 20 हजार लोक जमवू शकले नाही म्हणून हा नॅनो मोर्चा होता, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका केली.

Devendra Fadnavis News
Maharashtra Political News : भाजपची राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी; वरिष्ठ नेत्यांनी आखली मोठी रणनीती

दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडिया न वापरण्यावरून चांगलेच कान टोचले. ८-८ दिवस फेसबुकवर सक्रिय नसणाऱ्या भाजप आमदारांचेही फडणवीसांनी कान टोचले. यावरून पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करायला हवं, असे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com