Jayant Patil : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील वादग्रस्त ट्विट कोणी केले? जयंत पाटलांनी थेट इलॉन मस्क यांनाच केला सवाल

जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित करत ट्विट थेट ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनाच टॅग शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
Jayant Patil News
Jayant Patil News Saam Tv

Jayant Patil News : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याचा सीमावादाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या दोन्ही राज्याचा सीमावाद केंद्रातही पोहोचला. या वादादरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आले. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त ट्विट त्यांनी केल्या नसल्याचा दावा केला, असे माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्या ट्विटवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित करत ट्विट थेट ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनाच टॅग शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Marathi News)

ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या प्रमुख पदावरून राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्वत: ट्वीट करत 'मी ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार व्हावे का? असा थेट प्रश्न इलॉन मस्क यांनी ट्विटरवर केला आहे. मस्क यांचे ट्विट रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात ओढलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादवरून वादग्रस्त ट्विटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. 'कर्नाटकच्या ट्विटर हँडलवरून वादग्रस्त ट्विट ज्यांनी केलं आहे. त्याची माहिती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मिळाली आहे. याची माहिती सभागृहात मिळेल. या ट्विटच्या मागे कोणते पक्ष आहेत याची माहिती लवकरच मिळेलं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. याच मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे जयंत पाटील ट्विट करत शिंदे सरकारला घरण्याचा प्रयत्न केला आहे.

Jayant Patil News
Maharashtra Political News : भाजपची राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी; वरिष्ठ नेत्यांनी आखली मोठी रणनीती

जयंत पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद थेट ट्विटर प्रमुख इलॉन मस्क यांनाच वादात ओढलं आहे. जयंत पाटील ट्विट करत सवाल केला की, 'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? असा सवाल पाटील यांना केला. जयंत पाटील यांच्या प्रश्नाला इलॉन मस्क उत्तर देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com