शिवाजी पार्क येथील आंदोलनातील व्हायरल व्हिडिओवरून वाद
विरोधकांनी संबंधित व्यक्ती पोलिस असून महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला
मुंबई पोलिसांनी आरोप फेटाळत व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावल्याचे स्पष्ट केले
या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर आणि सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे
मुंबईत आंदोलक तरुणीशी कथित गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडिओवरून वाद निर्माण झालाय. ही व्यक्ती पोलीसच असल्याचा दावा विरोधकांनी केलाय. तर या व्हिडिओबाबत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात हा रिपोर्ट...
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह महाराष्ट्रात तरूण-तरूणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं करतायत... अशातच मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यानं तरूणीसोबत केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.... हा व्हिडिओ नीट पाहा... आंदोलनस्थळावरील विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी सिव्हिल ड्रेसमधील हा पोलीस अधिकारी थेट आंदोलनात घुसतोय... याच्या चेहऱ्य़ावरचा संताप हा नीट पाहा... आंदोलकांना पकडण्यासाठी आधी तो स्वत: आंदोलकांच्या गर्दीत घुसला... आणि त्यानं आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलवून आंदोलकांना पक़डण्याचे फर्मान सोडले....मात्र त्याच वेळी हा पोलीस एका तरुणीच्या मागे धावला आणि त्यानं काय केलं ते पाहा...
या पोलिसानं या तरुणाचा विनयभंग केल्याचा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय. विरोधकांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबई पोलीसांनी X पोस्टमधून स्पष्टीकरण दिलयं. शिवाजी पार्कवरील पोलीस कारवाईचा चुकीचा अर्थ लावला जातोय.. कायदा व सुव्यवस्था राखत असताना, एक पोलीस अधिकारी पुरुष आंदोलनकर्त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते..त्याचवेळी, एक महिला नकळतपणे त्यांच्यामध्ये आली. आणि ही घटना घडलीय.. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची पडताळणी केली आहे आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्या व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केले आहे.
मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना आंदोलकांची धरपकड पोलिसांनी का सुरु केली? महिला आंदोलक समोर असल्यास पुरुष पोलिसांनी बळाचा वापर का केला? गणवेशातले पोलीस मागे उभे असताना या सिव्हिल ड्रेसमधील पोलिसानं अचानक आक्रमक होण्याची गरज होती का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंदोलकांमध्ये तरुणीही असताना महिला पोलीस का तैनात नव्हत्या? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे या प्रकरणात पोलीस निष्पक्ष कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.