CJPची लवकरच राजकारणात एण्ट्री? CJPच्या पक्षसंघटना बांधणीसाठी हालचाली

आंदोलनातून सत्ताधाऱ्यांना हादरे दिल्यानंतर CJPनं नवी रणनीती आखलीये. अभिजीत दिपकेंच्या सीजेपीनं मोठा निर्णय घेतलाय. ही रणनीती इतर राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते. CJPनं काय रणनीती आखलीये?.... दिपकेंचं पुढचं लक्ष्य काय आहे?... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
CJP's Political Strategy:
CJP's Political Strategy:saam tv
Published On: 

जंतरमंतरवरील आंदोलनातून केंद्रातील सरकारला धक्के देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीनं अर्थात CJPनं सक्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत दिलेत. अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वातील CJPनं संघटना वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. संघटनेच्या विस्तारासाठी झोनल प्रभारी नेमले आहेत. इतकंच नव्हे तर देशातील 10 राज्यात राज्य आणि प्रादेशिक समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सीजेपीनं कुठल्या राज्यात किती सदस्य नेमले आहेत पाहुयात...

CJPचे कुठे-किती सदस्य?

राज्य सदस्य

उत्तर प्रदेश 16

महाराष्ट्र 15

झारखंड 14

ईशान्य भारत 14

बिहार 13

पश्चिम बंगाल 12

हरियाणा 06

राजस्थान 05

उत्तराखंड 06

जम्मू-काश्मीर 04

खरंतर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर CJPनं राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. मात्र, देशाला प्रभावी जनआंदोलनाची गरज असल्याचं सांगत CJPनं राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र, आता राजकीय पक्षाला आवश्यक असलेली संघटनात्मक बांधणी करून CJPनं राजकारणाकडे मोर्चा वळवणार असल्याचं दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे, सरन्यायाधीशांच्या टिप्पणीतून जन्माला आलेल्या CJPनं जंतरमंतरवरील आंदोलनातून आधीच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही पछाडलंय. त्यानंतर देशातील प्रत्येक राजकीय पक्षांकडून जेनझीला आपल्याकडे वळवण्याचे हरतऱ्हेनं प्रयत्न सुरू झालेत. मात्र, आता CJPनंच राजकारणात नशीब आजमवण्याचे संकेत दिले आहेत. CJP प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कोणत्या पक्षाची डोकेदुखी वाढणार? कोणत्या पक्षाचं निवडणुकीतलं यशाचं गणित बिघडणार? याचीच चर्चा आता रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.