शिवाजी पार्क आंदोलन पोलिसांनाच भोवणार? विद्यार्थ्यांनी पाठवल्या पोलिसांना नोटीसा

hivaji Park Protest Row:मुंबईतील शिवाजी पार्क आंदोलन आता पोलिसांनाच भोवण्याची शक्यता आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय. या अल्टिमेटमनंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांना कोर्टात खेचण्याची तयारी केलीये. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
MUMBAI STUDENTS ISSUE 24-HOUR ULTIMATUM TO POLICE OVER SHIVAJI PARK PROTEST ACTION
MUMBAI STUDENTS ISSUE 24-HOUR ULTIMATUM TO POLICE OVER SHIVAJI PARK PROTEST ACTIONsaam tv
Published On

मुंबईच्या शिवाजी पार्कात झालेलं आंदोलन पोलिसांनाच भोवण्याची शक्यता आहे. कारण 21 जुलैला झालेल्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाईविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवलाय. या कारवाईविरोधात विद्यार्थ्यांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना कायदेशीर नोटीस पाठवलीये. आंदोलनात विद्यार्थ्यांना बेकायदा ताब्यात ठेवत त्यांना एफआयआरची प्रतही दिली नाही. तसंच, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 अंतर्गत नोटीशींचा गैरवापर केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय. मागितलेली माहिती 24 तासांत न दिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय.

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 1 हजार 500 जणांविरोधात 15 एफआयआर दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दाखल केलेले आंदोलक नेमके कुठल्या वयोगटातले आहेत, त्यावर एक नजर टाकूयात...

- मुंबईत 1500 जणांविरोधात 15 एफआयआर

मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल 7 एफआयआरमधील 301 आरोपींपैकी 261 जणांच्या वयाची नोंद उपलब्ध आहे. 261 पैकी 57 आंदोलक 18 ते 20 वयोगटातील आहेत. तर 80 जण 21 ते 25 वयोगटातील आहेत. याशिवाय 53 जण 26 ते 30 वर्षे, 40 जण 31 ते 40 वर्षे आणि फक्त 31 जण 40 वर्षांवरील आहेत.म्हणजेच 52 टक्क्यांहून अधिक आंदोलक हे तरुण आहेत. तसंच, 301 एफआयआर दाखल आंदोलकांपैकी 91 महिला आणि 201 पुरुष आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, अनेक तरुण केवळ पाहण्यासाठी किंवा चित्रीकरण करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावरही गुन्हे नोंदवण्यात आल्याचं समोर आलंय. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांनाच कोर्टात खेचण्याची तयारी केलीये. आता विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या नोटिशीला मुंबई पोलीस काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com