CJP Protest: मोठी बातमी! सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

Saurav Das On CJP Protest: सौरव दास आणि अशुतोष रांका यांची आज सरकारसोबत दुसऱ्यांदा चर्चा झाली. २ तास झालेल्या या चर्चेत त्यांचा ३ पैकी २ मागण्या मान्य केल्या.
CJP Protest: सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?
Abhijit DipakeSaam Tv
Published On
  • कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट

  • सीजेपीच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा

  • सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य करण्यात आल्या

कॉक्रोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यामध्ये आज दुसऱ्यांचा चर्चा झाली. सीजेपीच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. तब्बल १ तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सीजेपीने सरकारपुढे ३ मागण्या मांडल्या. सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने मान्य केली नाही. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉक्रोच जनता पार्टी ठाम आहे. सरकारने सीजेपीकडे उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. त्यानंतर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत सीजेपीला निर्णय सांगितला जाईल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज सीजेपीच्या शिष्टमंडळातून सौरव दास आणि अशुतोष रांका यांनी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या भेटीवेळी सीजेपीने आपल्या ३ प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही त्यांची प्रमुख मागणी होती. तर आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या आणि पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या या त्यांच्या आणखी दोन मागण्या होत्या. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली पण सरकारने फक्त त्यांच्या दोनच मागण्या मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.

CJP Protest: सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?
VIDEO : अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम; केंद्राचा प्रस्ताव CJP ने फेटाळला, प्रधानांच्या राजीनाम्याचा पुनरूच्चार

कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतची वेळ मागितली आहे. सरकार धर्मेंद्र प्रधान यांना लवकरच पदावरून दूर करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. रांका यांनी असेही सांगितले की, आत्महत्या केलेल्या नीट उमेदवारांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणे आणि विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे आणि इतर कायदेशीर खटले मागे घेणे या दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

CJP Protest: सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?
CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सांगितले की, २ तास आमच्यामध्ये बैठक झाली. त्यांच्या ३ मुख्य मागण्या होत्या. परीक्षेतील सुधारणांसाठी ५ सूचना होत्या. आम्ही त्यांना सांगितले की, उद्या दुपारी पुन्हा भेटू आणि चर्चा करू. आमच्या चर्चेतील मुद्दे सरकारसमोर मांडू.' दरम्यान, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा सीजेपीने घेतला.

CJP Protest: सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?
CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com