CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Abhijit Dipke Big Statement: अभिजीत दीपके यांनी मोठा दावा केला आहे. आम्हाला आज अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
CJP ProtestSaam Tv
Published On
  • दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीचे आंदोलन सुरूच

  • सोनम वांगचुक यांनी सरकारशी चर्चेनंतर उपोषण मागे घेतले

  • अभिजीत दीपके यांनी आज आम्हाला अटक होऊ शकते असा दावा केला

  • दीपकेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला शुक्रवारी महत्वपूर्ण वळण आले आहे. २८ जूनपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण मध्यरात्री सरकारचे शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. तर दुसरीकडे अभिजीत दीपकेंचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. अशात त्यांनी मोठा दावा केला. आम्हाला आज अटक केली जाईल अशी माहिती मला मिळाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

अभिजीत दीपके यांनी दावा केला की, आमच्या टीमला आज संध्याकाळी अटक केली जाऊ शकते. त्यांनी आपल्या समर्थकांना शांततापूर्ण आंदोलन कायम ठेवण्याचे आवाहन केले. अभिजीत दीपके यांनी हा दावा केल्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. सरन्यायाधीश आणि सरकारी प्रतिनिधींची आज बैठक होणार आहे या बैठकीपूर्वी अभिजीत दीपके यांनी हा दावा केला आहे.

CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

दीपकेंनी सांगितले की, 'मला नुकतीच माहिती मिळाली की कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमला अटक होऊ शकते. मला या सरकारला विचारायचे आहे की, आम्हाला अटक का करायची आहे तुम्हाला आम्ही तर इथे शांततेने बसलो आहोत आणि त्याला ३५ दिवस झाले आहे. मला नाही वाटत ही स्वतंत्र भारतात इतक्या शांततेत एखादे आंदोलन झाले असावे.' त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'आम्ही महात्मा गांधींचे अनुयायी आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाचे चालणारे आहोत. आम्ही संविधानाच्या मार्गाचे चालणारे आहोत. तुम्हाला काय अडचण आहे भारताच्या संविधानाची जे तुम्हा आम्हाला अटक करत आहात.'

CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

अभिजीत दीपकेंनी इशारा दिला की, 'धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतर मंतरवरील आमचे आंदोलन सुरूच राहील. सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले उपोषण संपवल्याने आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे. त्यांचे जीवन या देशासाठी खूप मौल्यवान आहे.' केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीबाबत ते म्हणाले, 'ही बैठक तटस्थ ठिकाणी होईल. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरे काहीही आम्हाला मान्य नाही.'

CJP Protest: आम्हाला आज अटक करणार, अभिजीत दीपकेंचा दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com