'संविधान बदलण्यासाठी फोडाफोडी' खासदारांच्या फुटीमागे छुपी रणनीती? ठाकरेंचा गंभीर आरोप

Defections Politics Intensifies: अखेर ठाकरेसेनेच्या 6 खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय... मात्र खासदारांची ही फुट नेमकी कशासाठी? खासदारांच्या फुटीमागे कोणती छुपी रणनीती आहे? आदित्य ठाकरेंनी NDA सरकारवर कोणता आरोप केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
“Six MPs from Thackeray faction join Shinde camp, triggering political storm over alleged NDA strategy.”
“Six MPs from Thackeray faction join Shinde camp, triggering political storm over alleged NDA strategy.”saam tv
Published On

आधी तृणमूल काँग्रेस आणि त्यानंतर ठाकरेसेनेतील खासदारांची फुट यामुळे देशात फोडाफोडीच्या राजकारणाची चांगलीच चर्चा रंगलीय...तृणमूलच्या 20 खासदारांनी बंडखोरी करत NCPI पक्षात प्रवेश केला...तर ठाकरेसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करून शिंदेसेनेची वाट धरलीय..त्यामुळे एकाच महिन्यात दोन पक्षांचे तब्बल 26 खासदार का फुटले? असा प्रश्न उपस्थित केला जातोय..दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ही फोडाफोडी संविधान बदलण्यासाठी होत असल्याचा आरोप भाजपवर केलाय...

2024 च्या निवडणुकीआधी भाजपनं 400 पारचा नारा दिला होता... मात्र प्रत्यक्षात भाजपप्रणित एऩडीए सरकारला 400चा आकडा पार करता आला नाही... 2019 च्या निवडणुकी मात्र NDAनं इंडिया आघाडीला चांगलीच टक्कर दिली होती...

2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 353 जागा मिळाल्य़ा होत्या...तर इंडिया आघाडीला 91 जागांवर समाधान मानावं लागलं होतं... विशेष म्हणजे या निवडणुकीत एकट्या भाजपाला 303 जागांवर विजय मिळाला होता... त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएनं 400 पारचा नारा दिला... मात्र 2024 च्या निवडणुकीनंतर NDAला 293 जागांवर विजय मिळाला...तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या...त्यात भाजपला 2024 च्या निवडणुकीत 240 जागांवर विजय मिळाला...

२४० जागा मिळाल्यानं भाजपचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न 2024 च्या निवडणुकीत अपूर्ण राहिलं...त्यात 2029 च्या निवडणुकीसाठी डिलिमिटेशन विधेयक 2026 ला भाजपनं लोकसभेत मांडल्याची चर्चा आहे...मात्र हे डिलिमिटेशन विधेयक संसदीय अधिवेशनात वादाचा मुद्दा ठरलेले आणि नंतर इंडिया आघाडीच्या एकीमुळे गेल्यावेळी हे विधेयक नामंजूर झालं होतं.डीलिमिटेशनच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं पडली... मात्र डीलिमिटेशनचे विधेयक मंजूर होण्यासाठी 360 मतं आवश्यक होती...त्यामुळे डीलिमिटेशनसाठी 62 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे... अशातच तृणमूलचे 20 आणि ठाकरेसेनेचे 6 खासदार फोडल्यानं 26 खासदारांचा NDAला पाठिंबा मिळणार आहे...

या विधेयकाच्या आडून हुकुमशाही आणण्याचा आरोप काँग्रेस नेते सातत्यानं करत आले आहेत.मुळात 54 मतं कमी पडल्यामुळे डीलिमिटेशनचे विधेयक मंजुर झालं नव्हतं.. त्यामुळे याच टर्ममध्ये डिलिमिटेशन मंजुर करणं एनडीए सरकारसाठी महत्त्वाचं आहे... आणि त्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ खासदारांच्या फोडाफोडीतून मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधक करतायत...तृणमूल आणि ठाकरेसेनेतील फुटीमुळे NDAला 26 खासदारांचा पाठिंबा मिळणार आहे.....त्यामुळे डिलिमिटेशन आडून संविधान बदल केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय...आता डीलिमिटेशनसाठी आवश्यक असलेले संख्याबळ गाठण्यासाठी NDA नेमकं काय करणार? विरोधक खासदारांची ही फुट कशी रोखणार? याकडे देशाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com