

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात मोठा गोंधळ उडाला.
आंदोलनादरम्यान शाईफेक झाल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण बनले.
पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला.
सकाळचे 7 वाजलेले. गेल्या 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतरवर बसलेले cjp चे कार्यकर्ते. अचानक साध्या पेहरावातले पोलिस कर्मचारी घुसले..सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं..हे घडत असतानाच CJPचे अभिजित दिपकेंनाही नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. आणि जंतरमंतरवर एकच गोँधळाचं वातावरण निर्माण झालं.
आदल्या रात्री म्हणजे 17 जुलैला वांगचुक यांनी आपली तब्येत ढासळत असल्यांच म्हटलं होतं आणि सकाळी गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर आलं.
17 जुलै
वांगचुक यांचं उपोषण रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हालचाली सुरू
दुपारी 2.00 वाजता
दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोल्छा यांना पदावरून हटवल्यानंतर अवघ्या दीड तासांत अनुराग कुमार यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती
कार्यभार स्वीकारल्यानंतर अनुराग कुमार यांची तातडीनं विशेष पोलीस आयुक्तांसोबत बैठक
CJP च्या सदस्यांच्या दिनचर्येचा आढावा घेण्यात आला
18 जुलै
पहाटे 3 वाजता
पावसाळी अधिवेशनाच्या मॉक ड्रिलसाठी पहाटे ३ वाजता येण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश
प्रत्यक्षात वांगचुक यांना हटवण्याची पूर्वनियोजित कारवाई
सकाळी 7 वाजता
साध्या गणवेशातील आणि खाकी वर्दीतील पोलिसांचा मोठा फौजफाटा जंतर-मंतरवर दाखल
अवघ्या तीस सेकंदात मानवी साखळी करून पोलिसांनी वांगचुक यांच्याभोवती पांढऱ्या चादरी धरल्या आणि त्यांना ताब्यात घेतलं
सकाळी 7:30
जंतरमंतरवरून उचलून पोलिसांनी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं
सकाळी 8:30
CJPच्या अभिजित दिपकेंसह इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं
सकाळी 10.30
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत थेट रुग्णालय गाठलं
सकाळी 11.00
जंतर-मंतर आणि रुग्णालयाच्या परिसरात दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला.
दुसरीकडे सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही तर मी स्वत: आंदोलनात सहभाग होणार, असा इशारा गीतांजली यांनी दिलाय. ज्या पध्दतीने अचानकपणे वांगचुक यांना जबरदस्तीने नेण्यात आलं त्यानंचर जंतरमंतरवर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अभिजित दिपकेही प्रचंड भावूक झाले.. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा घेण्याची मागणी केली. - दरम्यान वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांना संबोधणाऱ्य़ा दिपकेंवर एका महिलेनं शाईफेकही केली. त्यामुळे जंतर- मंतरवरील आंदोलनात एकच गोंधळ उडाला.
वांगचुक यांना रुग्णालयात डांबल्यानंतर आता अभिजीत दिपके यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यामुळे हे आंदोलन आता संपण्याऐवजी अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेणार की CJPच्या आंदोलकर्त्यांना ताब्यात घेऊन 20 जुलैचं आंदोलन पूर्णपणे बंद पाडणार, याकडे देशाचं लक्ष लागलयं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.