CJP Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंच्या भाषणावेळी 'जय श्रीराम'चे नारे; पाहा VIDEO

Cockroach Janta Party Protest In Nagpur: नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी 'जय श्रीराम'चे नारे दिले. अभिजीत दीपकेंच्या भाषणावेळी गोंधळ घालण्यात आला.

नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झालं. या आंदोलनावेळी काही तरुणांनी गोंधळ घातला. अभिजीत दीपके यांच्या भाषणावेळी काही जणांनी जय श्रीरामचे नारे लगावले. अर्बन नक्षल लोकं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला. तर या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना बाहेर काढलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान हिंदुत्ववाद्यांनी घोषणाबाजी केल्या. आम्ही आमच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या समर्थनासाठी इथे आलो आहोत. काल जयपूरमध्ये मार पडला आज नागपूरात देशविरोधी वक्तव्य केले तर इथेपण दाखवून देऊ. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनस्थळी काहीं हिंदुत्ववादी पोहचले आहेत. या ठिकाणी आम्ही देशविरोधी घोषणा, नारेबाजी सहन करणार नसल्याचे हिंदुत्ववाद्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये नारेबाजी होऊ शकते तर इथे का नाही? आम्ही स्वातंत्र देशाचे नागरिक असल्याने आम्ही इथे आलोय. इथे आंदोलन करणारे कॉकरोच जनता पार्टीचे लोक अर्बन नक्षल असल्याचा आरोप त्यांनी केला. आरएसएस विरोधात घोषणाबाजी केल्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com