मुंबईतील डेअरिंगबाज तरुण आंदोलक, बेधडक GEN Z ; आंदोलनात डिजिटल पिढीचा स्वॅग

Mumbai Gen Z Protesters : आता एक आगळीवेगळी आणि जेन झींचं नवं रुप दाखवणारी बातमी. मुंबईतल्या आंदोलनात डेअरिंगबाज आणि बेधडक तरुणांनी सर्वांनाच अवाक केलं.आंदोलनातल्या आपल्या कॉक्रोच मित्रांसाठी पोलिसांना भिडणाऱ्या आणि त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटणाऱ्या जेन झींवरचा हा विशेष रिपोर्ट.
Mumbai Gen Z Protesters
Fearless Gen Z protesters in Mumbai demonstrationsaam tv
Published On

नुसत्या वयाचा विचार करुन GEN Z ला हलक्यात घेण्याऱ्यांसाठी हा एक व्हिडिओ काफी आहे. प्रशासनाच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणारी हीच ती पिढी. हा फोटो जरा नीट बघा.ही तरुणी आपल्या सोबतच्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी आहे. तिला ना व्हॅन अंगावर चालण्याची भीती ना. कायद्याचा धाक.'मार्वल'च्या सुपरहिरोलाही कॉम्प्लेक्स देईल अशी ही 'बाहुबली' पोज सध्या देशात चर्चेचा विषय ठरलीय.हे नुसतं मीम मटेरिअल नाहीये बरं का! हे आजच्या बेधडक तरुणाईचं चित्र आहे.

दुसरी दृष्य पाहा- दिल्लीत पेटलेलं आंदोलन, झालेल लाठीचार्जचं आणि त्याचे मुंबईत उमटलेले तीव्र पडसाद. मुंबईतल्या तरुणांनी उत्स्फुर्तपणे आंदलोन केलं आणि मुंबई पोलीसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले, त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पकडलं आणि दणकून व्हॅनमध्ये कोंबलं. वाटलं आता विषय संपला! पण थांबा. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त! आणि सिनेमातच शोभावं असं हे दृश्य.पाहा पोलीस या आंदोलकांना व्हॅनमधून नेतायत.

या व्हॅनच्या मागे काही जेन झी चालतायत. एका जेन झीनं या चालत्या व्हॅनची बाहेरुन लावलेली कडी काढली आणि आपल्या कॉक्रोच मित्रांना पोलिसांच्या तावडीतून मुक्त केलं. त्यामुळे पोलिस काका या GEN झींना हलक्यात घेऊ नका. आता पुढे बघा- जंतर-मंतरवरील 'सबवे सर्फर्स' रन. हातात मोबाईल, फ्रंट कॅमेरा ऑन, चेहऱ्यावर 'स्वॅग'. आणि मागे दणकून पळणारे पोलीस दादा! भावाने तर जंतर-मंतरलाच 'मोबाईल गेमचा सेट' बनवून टाकलाय! कॉइन्सच गोळा करायचे राह्यलेत,

Mumbai Gen Z Protesters
CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

बाकी 'इन्स्पेक्टर' मागे पळतोय हा सीन तर अगदी सेम टू सेम जमलाय! ही मुलगी पाहा- ही थेट पोलिसांच्या काठ्या खायला चाललीय- आणि ते ती अभिमानाने सांगतेय. लागेल, दुखेल याची कसलीच भिती नाही. आंदोलनाला जाताना पोझेसही देतेय. तिकडे जंतर मंतर थेट स्वत: गांधीजीच आलेत. आपले GEN Z चे गांधीजी. सिझन वनचे प्लेअर म्हंटलंय त्यांना. स्वातंत्र्याचा दुसरा लढाच घोषित केलाय gen z ने या आंदोलनाला.

अश्रुधुराच्या नळकांड्या कशाला म्हणतात ओ? या अश्रुधुराच्या नळकांड्यांनी मोठ्ठे मोठ्ठे गार केलेत गंम्मतमध्ये. आणि या GEN ने त्याची हवाच काढून टाकली. ज्या अश्रुधुराच्या नळकांड्यांमध्ये मोठ्या मोठ्या गुन्हेगार- आतंकवाद्यांना रडवायची ताकद असते. त्याच अश्रुधुरासोबत ही पोरं खेळलीयत. त्यामुळे अश्रूधुराच्या नळकांड्यांची भीतीच संपेल की काय अशी भीती पोलिसांना वाटली नसेल तर नवल.

Mumbai Gen Z Protesters
CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

GEN Z ची आपापली मतं आहेत आणि ती बेधडक आहेत. त्यांची आपली स्वत:ची जगण्याची स्टाईल आहे....आणि तेच या आंदोलनातूनही दिसलं. या अतरंगी व्हिडिओंवर मीम्स बनतील, लाईक्स मिळतील, कमेंट्सचा पाऊस पडेल... पण प्रश्न हा आहे की आपल्या या तरुणाईचं भविष्य नक्की कुठल्या दिशेने चाललंय? गाडीची कडी उघडून पोलिसांतच्या तावडीतून पळून जाणं सोपं आहे, पण व्यवस्थेनं निर्माण केलेली भविष्यातली बेरोजगारी, शिक्षण आणि हक्कांच्या प्रश्नांची कडी ही जेन झी कशी उघडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com