

काँग्रेसने पाच राज्यांत स्क्रीनिंग समित्या स्थापन केल्या आहेत.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समित्यांमध्ये समावेश
कोल्हापूरचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना गोवा स्क्रीनिंग समितीत स्थान
आगामी काळात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पाच राज्यांसाठी स्क्रीनिंग समित्यांची स्थापना केलीय. यात कोल्हापूरमधील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मोठी जबाबदारी देण्यात आलीय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी या समित्यांवर वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केलीय.
उत्तर प्रदेशच्या स्क्रीनिंग समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अजय माकन यांच्याकडे सोपवण्यात आलीय. तर कोल्हापूरचे नेते सतेज पाटील यांना काँग्रेसनं गोव्याच्या स्क्रीनिंग समितीमध्ये घेतलंय. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलनं महायुतीला नमवत शानदार विजय मिळवला. त्यानंतर अध्यक्षपदासाठी सुरू झालेल्या संघर्षात सतेज पाटील यांनी संपूर्ण महायुतीविरोधात अंगावर घेणाऱ्या सतेज पाटील यांना काँग्रेसनं आता मोठी जबाबदारी सोपवलीय.
पंजाबच्या समितीचे अध्यक्ष म्हणून सिरिवेला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठी या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीत एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांची छाननी करण्याची महत्त्वाची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सचिन सावंत आणि निवेदित अल्वा हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. उत्तराखंडच्या समितीच्या अध्यक्षपदी दीपा दासमुन्शी यांची नियुक्ती करण्यात आलीय. अनिल चौधरी आणि पाल भाई अंबालिया हे सदस्य असतील. गोव्यासाठी के. जे. जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सतेज पाटील आणि शफी परंबिल यांचा समावेश आहे.
मणिपूरच्या समितीच्या अध्यक्षपदी बी. एम. संदीप यांची नियुक्ती करण्यात आलीय. हिबी ईडन आणि राजेश ठाकूर हे सदस्य असतील. या समित्यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची पार्श्वभूमी, पक्षातील कामगिरी आणि निवडून येण्याची क्षमता यांची छाननी केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.