Weather Update:145 किमीच्या वेगानं येतंय चक्रीवादळ; सोसाट्याच्या वाऱ्यासह 13 राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस

Weather Update: बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.दक्षिण भारतातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Weather Update:
Cyclone Alert: 145 Kmph Winds, Heavy Rain Forecast In South Indiasaam tv
Published On: 
Summary
  • बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे ताशी १४५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

  • दक्षिण भारतातील काही राज्यांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा.

  • १७ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र १७ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत एका भीषण चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम दक्षिण भारतातील अनेक राज्यांवर दिसून येईल. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मंगळवारी देशातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे.

या राज्यात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि अंदमान व निकोबार बेटांचा समावेश आहे. दरम्यान, दक्षिण भारताच्या किनारपट्टीच्या भागांत जोरदार वाऱ्यांबाबत इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी असू शकतो आणि वाऱ्याच्या जोरदार झोतांसह तो ताशी १०० किमीपर्यंत पोहोचू शकतो.

Weather Update:
Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत दक्षिण भारतात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी या प्रदेशांत अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचे भाग आणि यानममध्ये १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत रायलसीमा भागातही पावसाचा अंदाज आहे. १९ ते २० नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचे भाग आणि रायलसीमामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मच्छिमारांना बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय.

Weather Update:
Weather Update:कडाक्याच्या थंडीआधी हवामानाचा यू-टर्न! १६ राज्यांत पावसाचा अंदाज; कुठे पाऊस, तर कुठे ताशी ६० किमी वेगाने वारे!

यूपीचं हवामान कसं असणार?

उत्तर प्रदेशसाठी १७ नोव्हेंबर रोजी पावसाचा कोणताही नवीन इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, राज्यातील दोन्ही भागांत धुक्याचे वातावरण कायम राहणार आहे. हवामान विभागाने १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये दाट धुक्याचा इशारा दिलाय. १६ नोव्हेंबर रोजी काही भागांत अतिशय दाट धुके नोंदवण्यात आले होते. परिणामी १७ नोव्हेंबरच्या सकाळीही अनेक ठिकाणी दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी राहण्याची शक्यता आहे. धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.

बिहारमध्ये हलका ते मध्यम पावसाचा शक्यता

१७ नोव्हेंबर रोजी बिहारमधील हवामानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या कालावधीत विविध क्षेत्रांत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, १७ नोव्हेंबरसाठी बिहारमध्ये पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वाऱ्यांबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये.

दिल्लीत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता

मंगळवारी दिल्लीतील आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील, मात्र सकाळच्या वेळी धुरके आणि हलके धुके असू शकते. काही भागांत मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.