Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena News : 'आम्ही चालवू हा पुढे वारसा', शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुंबईत शिंदे गटाची बॅनरबाजी; पाहा VIDEO

Shiv Sena Vardhapan Din Update : शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्समधून एकमेकांना चिमटे काढण्यात आलेत.

Satish Daud

शिवसेनेचा आज बुधवारी ५८ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. उद्धव ठाकरे हे षण्मुखानंद सभागृहात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळीच्या डोम येथे वर्धापन दिन साजरा करणार आहेत. दरम्यान वर्धापनदिनी मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्समधून एकमेकांना चिमटे काढण्यात आलेत.

'आम्ही चालवू हा पुढे वारसा', अशा आशयाचे बॅनर्स लावून शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने देखील षण्मुखानंद सभागृहाबाहेर बॅनरबाजी केली आहे. या बॅनर्सवर छापलेला मजकूर हा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं होतं. ठाकरे यांच्या पक्षाने ९ तर शिंदेंच्या शिवसेनेने ७ जागांवर विजय मिळवला होता. यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. मात्र, महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळवल्याने ठाकरे गटात जास्त उत्साह आहे.

लोकसभेतील यशामुळे विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडीने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार, कुणाला लक्ष्य करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही चांगलाच उत्साह संचारला आहे. आम्ही महायुतीतील मोठे भाऊ असल्याचं पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात असा सूर शिंदे गटातील नेत्यांचा आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

SCROLL FOR NEXT