Nana Patole News : नाना पटोले माझे दैवत, यापुढेही त्यांचे पाय धुणार; काँग्रेस कार्यकर्ता संतापला, पाहा VIDEO

Congress Party Worker Viral Video : होय मी नाना पटोले यांचे पाय धुतले, यापुढेही आणखी धुणार. ते माझे दैवत असून तुम्ही राजकारण करू नका, असं विजय गुरव याने विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
नाना पटोले माझे दैवत, यापुढेही त्यांचे पाय धुणार; काँग्रेस कार्यकर्ता संतापला, पाहा VIDEO
Nana Patole NewsSaam TV

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर महायुतीतील नेत्याने पटोले यांच्यावर टीकेचा भडीमार केला. लोकसभेतील निकालामुळे काँग्रसचे नेते हुरळून गेले असा आरोपही काहींनी केला. दरम्यान, पाय धुणारा कार्यकर्ता माध्यमांसमोर आला आहे.

नाना पटोले माझे दैवत, यापुढेही त्यांचे पाय धुणार; काँग्रेस कार्यकर्ता संतापला, पाहा VIDEO
Maharashtra Politics : विधानसभेसाठी भाजपची रणनिती ठरली; महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत दिल्लीत काय निर्णय झाला? पाहा VIDEO

विजय गुरव असं या कार्यकर्त्यांचं नाव असून तो शेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. विजयने विरोधकांच्या टीकेवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. होय मी नाना पटोले यांचे पाय धुतले, यापुढेही आणखी धुणार. ते माझे दैवत असून तुम्ही राजकारण करू नका, असं त्याने विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.

"नाना पटोले देवदर्शनासाठी आले असताना त्यांचे पाय चिखलाने भरले होते. मी पाणी आणून त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे? पटोले हे माझ्या वडिलांसमान असून ते माझे दैवत आहेत, मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेल", असं विजय गुरवने म्हटलं.

"या विषयाला घेऊन आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून नानाभाऊ पटोले यांच्यावर केल्या जाणारे आरोप थांबवावे. तसेच माझ्या नावाने आपल्या राजकारणाची पोळी शेकून घेऊ नये", अशी विनंती देखील विजयने केली आहे.

दरम्यान, विजय गुरव हा काँग्रेसचा कट्टर समर्थक असल्याचं कळतंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या भागात आले, की तो आवर्जून त्यांच्या सेवेत हजर असतो. पाय धुण्याचे प्रकरण गाजल्यानंतर विजय काही काळासाठी नॉट रिचेबल झाला होता. मात्र, विरोधकांकडून टीका झाल्यानंतर त्याने माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

नाना पटोले माझे दैवत, यापुढेही त्यांचे पाय धुणार; काँग्रेस कार्यकर्ता संतापला, पाहा VIDEO
Nana Patole Video: कार्यकर्त्याने चिखलाने माखलेले पाय खरंच धुतले का?, नाना पटोलेंनी घटनाक्रमच सांगितला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com