Rain, Pune Rain, Pune, PCMC, School Holiday, Khalapur, Matheran Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Updates : पुणे, पिंपरी चिंचवड, खालापूर, माथेरानच्या शाळांना सुट्टी जाहीर

अतिवृष्टीचा इशारा दिल्याने सुरक्षितता म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

गोपाल मोटघरे, Siddharth Latkar

पुणे/ पिंपरी चिंचवड : पुणे (pune) आणि पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) परिसरात पडत असलेल्या (pune rain update) पावसामुऴे (rain) तसेच हवामान खात्याने पुढील दाेन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळांना (school holiday) उद्या (गुरुवार) सुटी जाहीर केली आहे. (pune rain latest update)

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने दाेन दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गुरुवारी (ता. १४ जुलै) पुणे मनपा हद्दीतील सर्व बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची माहिती पुणे महापालिकेची महापाैर मुरलीधर माेहाेळ (murlidhar mohol) यांनी देखील ट्विट करुन जनतेपर्यंत पाेहचवली आहे.

दरम्यान हवामान खात्याने पिंपरी चिंचवड शहरात आणि परिसरात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या धर्तीवर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी उद्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खाजगी आणि महापालिकेच्या शाळा बंद ठेवण्याच्या आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात मागील पाच-सहा दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस पडत आहे. आणि त्यात अजून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने महापालिका आयुक्तांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

खालापुरात दाेन दिवस शाळांना सुट्टी

पुण्याप्रमाणे रायगडात देखील पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांनी खालापुर परिसरातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंघाने नागरिकांनी सतर्क रहावे तसेच गरज नसताना घराबाहेर पडु नये असे अवाहन खालापुर तहसिलदार तांबोळी यांनी केले आहे. याबराेबरच माथेरान येथील शाळांना देखील प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. पालकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT