Pune Rain : पुण्यात पावसाचं रौद्ररूप; पुरामुळं पुलावर अडकला होता तरूण, थरारक Video पाहा

पुण्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यात तरूण अडकला होता.
Pune Rain Update
Pune Rain Update SAAM TV
Published On

साम टीम, पुणे: पुणे आणि परिसरात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पुराच्या पाण्यात तरूण अडकला होता. बराच वेळ तो येथील खांबाला पकडून उभा होता. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाची पुराच्या पाण्यातून सुटका केली. या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Pune flood marathi news)

Pune Rain Update
Maharashtra Rain Update Live: कुठे पूर, कुठे दरडी कोसळल्या; पावसाचा सर्वत्र हाहाकार, पाहा ताज्या अपडेट्स

पुणे (Pune) आणि परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. तर पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाऊस क्षणाक्षणाला रौद्ररूप धारण करत आहे. शिवणे स्मशानभूमी नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. याच पुलावर एक तरूण अडकला होता. मध्यभागी असलेल्या खांबाला पकडून बराच वेळ हा तरूण थांबला होता. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. (Pune Flood)

Pune Rain Update
Kolhapur rain updates: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पाणी पातळी वाढली

पुण्यात कात्रज जुना बोगदा येथे दरड कोसळली

पुण्यात कात्रज जुना बोगदा येथे दरड कोसळली असून, रस्त्यावर दगड आले आहेत. याबाबत माहिती मिळताच महापालिकेचे पथक रवाना झाले आहे. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहचले आहेत. आठ दिवसांपूर्वी याच रस्त्यावर दरड कोसळली होती. गेल्या चार-पाच दिवसांपासून पुण्याच्या आजूबाजूला जोरदार पाऊस सुरू आहे.

पुण्यातील टिळक रोडवर भलेमोठे झाड कोसळले

पुण्यातील टिळक रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळले असून, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. टिळक रोडवरील एसबीआय बॅंकेच्या समोर ही घटना घडली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अग्निशमन दलाकडे आज अखेर एकूण १०० झाड कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात होत आहेत. झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या अजूनही रस्त्यावर पडलेल्या आहेत.

नदीपात्रात मध्यभागी अडकलेल्या वासराची सुटका

शिवणे येथील नदीपात्रात मध्यभागी अडकलेल्या एका वासराला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर व जवान संतोष भिलारे, सुनील दिवाडकर, भरत गोगावले, राकेश बरे व चालक ज्ञानेश्वर बाठे यांनी हे बचावकार्य केले.

भिडे पूल पाण्याखाली

पुण्यात पावसाची संततधार सुरूच आहे. भिडे पुलावरून पाणी गेल्यानं ते वाहतुकीसाठी बंद आहे. मुठा नदीलगतचे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. भिडे पुलाला जलपर्णीने वेढले आहे. अर्धा रस्ता जलपर्णीने हिरवा दिसत आहे. पालिकेचे कर्मचारी भिडे पुलाला अडकलेला कचरा आणि जलपर्णी हटवत आहेत.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com