Kolhapur rain updates: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पाणी पातळी वाढली

कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे आता धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
Kolhapur Rain Updates Today, Kolhapur Flood Latest News, Panchaganga Water Level News
Kolhapur Rain Updates Today, Kolhapur Flood Latest News, Panchaganga Water Level News Saam Tv

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे (Rain) आता धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्याचबरोबर नद्यांची पाणीपातळीही वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट पाच इंच एवढी झाली आहे. नदीचे पाणी कोल्हापूर शहराजवळ पात्राबाहेर गेल आहे. पावसाची रिपरिप अशीच राहिली तर आज रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळीवर म्हणजेच ३९ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. (Kolhapur Rain Updates Today)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कुंभी कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोगे -कुडित्रे पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावर मयत गवा रेडा अडकला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने विद्यार्थी आणि नोकरदारांची अडचण झाली आहे.

Kolhapur Rain Updates Today, Kolhapur Flood Latest News, Panchaganga Water Level News
Maharashtra Rain Update Live: पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक उशिरा धावणार; पुण्यात भिडे पूल पाण्याखाली

आज दिवसभर असा मुसळधार पाऊस सुरू राहिला तर नदीचे पाणी पात्रा बाहेर पडू शकते. यासाठी आता प्रशासन सतर्क झाले आहे. एनडीआरएफच्या टीम तयार आहेत. नदी साईडच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस (Rain) सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. (Panchaganga Water Level News)

Kolhapur Rain Updates Today, Kolhapur Flood Latest News, Panchaganga Water Level News
Maharashtra Rain Update Live: पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक उशिरा धावणार; पुण्यात भिडे पूल पाण्याखाली

पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक उशिरा धावणार

आज सकाळपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीत बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, मुसळधार पावसामुळे (Rain) रेल्वे पटरीवर पाणी साचले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक उशिरा धावणार आहे. (Mumbai Train News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com