- सिद्धेश म्हात्रे / सचिन कदम
नवी मुंबई /रायगड : रायगड जिल्ह्यात (raigad rain) गेले दाेन दिवस पावसाने (Rain) जाेरदार हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील (Raigad) उरण तालुक्यात जांभूळ पाडा येथील कातकरी वाडीत मुसळधार पावसामुळे घर कोसळले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान प्रशासनाने माथेरान (matheran) येथील शाळांना (school) सुट्टी जाहीर केली आहे. (rain updates in Maharashtra)
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जांभूळ पाडा येथील कातकरी वाडीत मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याने राम कातकरी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पत्नीस गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार मुसळधार पावसात रात्री दाेन वाजता ही घटना घडली. तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या कुटुंबास प्रशासनाने प्राथमिक मदत सुपुर्द केली आहे. या कुटुंबास तातडीने शासकीय मदत (निधी) मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनास केली आहे.
दरम्यान रायगड जिल्ह्यात जाेरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सवित्री, उल्हास, कुंडलीका आणि उल्हास नद्याना दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीचे पाणी नेरळ - दहिवली पुलावरून वाहू लागल्याने वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.
आंबा नदीचे पाणी वाढल्याने पाली - वाकण वाहतुक बंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागात प्रशासन सतर्क असून माथेरानमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नेरळ रेल्वे स्थानकामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.