नाेएडा : वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रोचे कोचची नाेंदणी करण्यासाठीची परवानगी मागितली असताना देखील तसेच त्यास मंजूरी मिळून सुद्धा पाेलीसांनी अटक (arrest) केल्याने युट्युबर गौरव तनेजा (Youtuber Gaurav Taneja) याने नोएडा पोलिसांच्या (police) कृतीवर कायदेशीर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गाैरवने केलेले एक ट्विट (tweet) चांगलेच चर्चेत आले आहे. (gaurav taneja latest marathi news)
गाैरव तनेजा याचा शनिवारी वाढदिवस हाेता. त्याची पत्नी रितू राठी हिने केलेल्या आवाहनानंतर मेट्रो स्थानकाबाहेर युवकांचा तसेच गाैरवच्या चाहत्यांचा मोठा जमाव जमला हाेता. त्यामुळं नोएडा पोलिसांनी त्याच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली हाेती.
दरम्यान फ्लाइंग बीस्ट नावाने यूट्यूबवर चॅनल चालवणारे तनेजा आणि त्याची पत्नी रितू राठी यांनी एका निवेदनात घटनास्थळी जमलेल्या ‘चाहत्यां’मुळे कोणतीही हानी झाली नाही असे म्हटलं आहे. या निवेदनात त्यांनी आमचे चाहते हिंसक नव्हते किंवा त्यांनी कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा दिल्या नाहीत, कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान देखील केले नाही असेही म्हटलं आहे. आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबून झालेल्या घटनेवर निश्चित न्याय मागणार असल्याचे दाेघांनी चाहत्यांना सांगितलं आहे.
रितूला गाैरवच्या वाढविसा निमित्त नोएडा येथून चार डब्यांच्या मेट्रोमध्ये वाढदिवसाची पार्टी देऊन सरप्राईज द्यायचे होते. त्याचे फूल प्लॅनिंग तिने केले हाेते. तसेच त्याबाबतची माहिती तिने चाहत्यांपर्यंत समाज माध्यमातून पाेहचवली हाेती. त्यानंतर गाैरवच्या चाहत्यांनी मेट्राे स्टेशन बाहेर तुफान गर्दी केली हाेती.
दरम्यान गाैरव तनेजा यास अटक शनिवारी नाेएडा पाेलीसांनी अटक केल्यानंतर त्याला रविवारी साेडून देण्यात आले हाेते. गाैरवने वाढदिवसानिमित्त आलेल्या त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. आज गाैरवने एक ट्विट करुन त्याने पत्नीला चिमटा काढल्याचं बाेललं जात आहे. गाैरव लिहिताे थप्पड़ से डर नहीं लगता साहब…बीवी की सरप्राइज प्लानिंग से लगता है... गाैरवच्या या ट्विटवर त्याचे चाहते मात्र खूष दिसत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.