Satara : पाटण तालुक्यात भूस्खलन; प्रशासनाने ग्रामस्थांचं केलं स्थलांतर

सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांना पावसाने आजही झाेपडले आहे.
patan, landslide, rain, satara
patan, landslide, rain, satarasaam tv

सातारा : गेल्या दाेन दिवसांपासून सातारा (satara) जिल्ह्यात पावसाची (Rain) संततधार सुरु आहे. पावसामुळे सखल भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले भरुन वाहु लागले आहेत. जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यात भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर आणि त्यापुर्वी प्रशासनाने ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविलं आहे. (Satara Rain Latest Update)

पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुले वाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर भुस्खलन झाले. घटनास्थळी प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी भेट दिली. गाढे यांनी सहका-यासमवेत तेथील रस्ता एकेरी सुरू केला. त्यानंतर या भागातील धाेका लक्षात घेता तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेअंती ग्रामस्थांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले. स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना सुविधा दिल्या जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

patan, landslide, rain, satara
पर्यटन स्थळावरील जमावबंदी आदेश रद्द करा, रायगडकरांची मागणी; आंबाेलीत पाेलीसांचं चुकलं ?

जितकरवाडी (ता.पाटण) येथे भुसख्खलन होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील ग्रामस्थांना जिंती येथील शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. स्थलांतरित ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी दिली.

patan, landslide, rain, satara
Vijay Mallya Case : विजय मल्ल्यास सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; चार महिने तुरुंगवास

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यातील विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही भागात सुरु आहे. आज (साेमवार) सकाळी आठ वाजेपर्यंत 65 मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस नोंदविलेली ठिकाणे.

महाबळेश्वर 107.3 मिली मीटर

पाटण 101.3

परळी 74.8

बामणोली 76

महावशी 68.5

हेळवक 131.8

मरळी 65.8

मोरगिरी 96.8

मल्हारपेठ 65.8

तापोळा 65.5

लामज (गाव) 118.3

Edited By : Siddharth Latkar

patan, landslide, rain, satara
सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहताना तरुणाई गुणगुणतेय काय झाडी, काय डाेंगर, काय पठार...समंद OK
patan, landslide, rain, satara
Eknath Shinde : केंद्राच्या पहिल्याच बैठकीत भुमीपुत्रानं घेतला साताऱ्यासाठी महत्वपुर्ण निर्णय
patan, landslide, rain, satara
Wimbledon 2022 : कुस्तीच्या पंढरीतील ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड (व्हिडिओ पाहा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com