सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील पाटण (Patan) तालुक्यातील तारळे (tarale) भागातील सडावाघापूर (sadawaghapur) परिसरात पडत असलेल्या पावसामुळे (rain) डोंगरातून छोटे-छोटे धबधबे (waterfall) वाहू लागले आहेत. याठिकाणी देशभरातील पर्यटक (tourists) येथील उलटा धबधबा (sadawaghapur reverse waterfall) पाहण्यासाठी येऊ लागले आहेत. (sadawaghapur reverse waterfall latest marathi news)
निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या या परिसरात पडत असलेला रिमझिम पाऊस आणि दाट धुके याने निसर्ग सौंदर्यात भर पडल्याचे चित्र याठिकाणी पाहावयास मिळत आहे. हा उलटा धबधबा सध्या निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण ठरु लागले आहे. येथील निसर्गरम्य परिसर, उंच पवनचक्क्या , दाट धुक्याची चादर , हिरवाईने फुललेला हा परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरु पाहत आहे.
दिवसेंदिवस येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून धबधबा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी या परिसराला भेट देत आहेत. यावेळी येणारे तरुण पर्यटक आमदार शहाजीबापू पाटील यांचा डायलाॅग गुणगुणत आहे. काही जण काय झाडी, काय डाेंगर, काय पठार असेही म्हणत आहेत. गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी उलटा धबधबा पर्यटकांना पाहता आला नाही. परंतू आता याठिकाणी मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमी येऊन आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.