सातारा : भाजप (bjp) आमदार जयकुमार गाेरे (jaykumar gore) यांना सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) वडूज न्यायालयात शरण जा असा आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातारा (satara) जिल्ह्यात एका फसणुकीच्या गुन्ह्यात आमदार गाेरेंनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यासंदर्भात न्यायालयाने आमदार गाेरेंना आदेश केले आहेत. (Jaykumar Gore News) (Jaykumar Gore Bail News)
मायणीतील एका मयत माणसाची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडीत गुन्हा दाखल झाला हाेता. यामध्ये अटक हाेऊ नये यासाठी गोरे यांनी वडुज सत्र न्यायालयात (vaduj session court) अटकपूर्व जामीनासाठी अर्ज (jaykumar gore (pres arrest bail application) केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आमदार गाेरेंनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावले हाेते. (Jaykumar Gore Latest Marathi News)
मुंबई उच्च न्यायालयाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीना अर्ज फेटाळला आहे. दरम्यान या निकालाला सर्वोच्च न्यायालयात (supreme court) आव्हान देता यावे यासाठी गोरेंना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली हाेती. ही मुदत देताना न्यायालयाने तोपर्यंत गाेरेंना अटक करु नये अशी सूचना केली हाेती. या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने वडूज न्यायालयात शरण जा असा आदेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.