Schools closed in Thane, Navi Mumbai Tomorrow Saam Tv
मुंबई/पुणे

Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Schools closed in Thane, Navi Mumbai Tomorrow : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि सिंधुदुर्गातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने सर्वांचीच दाणादाण उडल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं आहे.

यातच आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच सिंधुदुर्गातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा रेड अलर्ट असल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ उद्या सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आदेश अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगडावर ढगफुटी

किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस झालाय. त्यामुळे रायगडच्या पायरी मार्गाला ओढ्याचं स्वरुप प्राप्त झालंय. तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्या प्रमाणे पावसाचे पाणी वाहताना दिसून आलंय. मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रायगडावर होते. त्यांना गडावरुन खाली येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागलीये.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातल्या कंट्रोलरुममध्यचे मुंबईतल्या स्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे मुंबईत पुरती दाणादाणा उडालीय. मुंबईचं पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. ती क्षमता वाढवण्याची गरज असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. तर राज्यातही बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. त्याबबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव डंपरची १० वाहनांना धडक, १३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुटुंबातूनच आव्हान

Motorola Edge 70 : मोटोरोलाच्या फोनमध्ये आहेत ‘हे’ दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत किती?

प्रवाशांसाठी खुशखबर! कोकण अन् सिंधुदुर्गला ८ गाड्यांचा थांबा; कधीपासून होणार सुरूवात?

ONGC Recruitment: खुशखबर! ONGCमध्ये नोकरीची संधी; २६२३ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT