मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता
Sharad PawarSaam Tv

Sharad Pawar Video: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता

Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला मान्यता दिली आहे.
Published on

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी चिन्हाला मान्यता दिली आहे.

आज शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ही मान्यता दिली. याशिवाय कलम 29 B नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापुढे देणगी सुद्धा स्वीकारता येणार आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता
Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल आभार.''

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूप्त देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता, तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हतं. मात्र आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे.''

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हाला निवडणूक आयोगाने दिली मान्यता
Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

सुळे म्हणाल्या की, ''दुसरी एक मागणी चिन्हातील गोंधळाबद्दल होती, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये, ही विनंती केली आहे. आयोग म्हणाला त्यावर आम्ही अभ्यास करू.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com