Eknath Shinde: मुंबई तुंबली, लोकल थांबली, नालेसफाईचे तीनतेरा; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले, पाहा VIDEO

CM Eknath Shinde reaction on Mumbai rains: मुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीला विशेष प्रतिक्रिया देत मुंबईतील परिस्थितीबाबत सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली आहे.
CM Eknath Shinde reaction on Mumbai rains
CM Eknath Shinde reaction on Mumbai rainsSaam TV
Published On

मुंबईत मुसळधार पावसाने चांगलंच थैमान घातलं असून गेल्या ६ तासांत तब्बल ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुंबईतील रस्ते जलमय झालेत. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. लोकल ट्रेनला देखील या पावसाचा मोठा फटका बसलाय. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहे.

CM Eknath Shinde reaction on Mumbai rains
Raigad Fort Closed: किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट

यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मुंबईतील नालेसफाईचा पुन्हा एकदा फज्जा उडाल्याचं सांगत विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी सरकारला लक्ष केलं आहे. ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पावती दिली आहे, अशी टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.

केंद्रापासून मुंबई महानगरपालिका पर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली, असा टोलाही वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीला विशेष प्रतिक्रिया देत मुंबईतील परिस्थितीबाबत सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे", असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

"लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे", असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईकरांना केलंय.

अजित पवार यांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबईतील पावसाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्वीट करत माहिती दिली आहे. "काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे", असं अजित पवार म्हणाले.

"हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे", असंही अजित पवार म्हणाले.

CM Eknath Shinde reaction on Mumbai rains
Mumbai Local Train : मोठी बातमी! धावत्या लोकलमधून महिला पडली, दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले; थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com