Raigad Fort Closed: किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट

Maharashtra Rain Latest Updates: किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Raigad Rain News:  किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट
Saamtv

सचिन कदम, ता. ८ जुलै २०२४

रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी रायगडावर निर्माण झालेल्या ढगफुटी सदृष्य परिस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. महाड प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांच्या निर्णयानुसार पुढील आदेश येईपर्यंत रायगडाचे द्वार पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

Raigad Rain News:  किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट
Pune News: मुंबईतील मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस रद्द; बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळला. या मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातुन ज्या प्रमाणे खळाळून पाणी वहाते त्याप्रमाणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते. तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्या प्रमाणे पावसाचे पाणी वाहिले.

या पावसानंतर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद केला आहे. किल्ले रायगडावर गेलेल्या पर्यटकांना दुपारपर्यंत सुरक्षित खाली उतरवल्यानंतर रायगड रोपवे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. रायगडचा पयरी मार्ग आज पासून 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्यासंबधी रायगड जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Raigad Rain News:  किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट
Dhule crime : किरकोळ भांडणातून पत्नीचा खून; दारूच्या नशेत असलेल्या पतीचे कृत्य

स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडमध्ये पावसाचा रेड अर्लट जाहिर करण्यात आला असून गरज नसताना घरा बाहेर पडू नका नदी, नाले, समुद्र किनारी, धबधबे अशा ठिकाणी न जाण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Raigad Rain News:  किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद! स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर; ढगफुटीसदृश्य पावसानंतर प्रशासन अलर्ट
NCP Crisis: तुतारी- पिपाणी वादावर फैसला, अजितदादांचे ७ आमदारही धोक्यात, शरद पवारांचा मोठा डाव; दिल्लीत काय घडणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com