Mumbai Local Train : मोठी बातमी! धावत्या लोकलमधून महिला पडली, दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले; थरारक VIDEO
मुंबईसह उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेला बसला आहे. ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मिळेल ती लोकल पकडून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीबीडी बेलापूर स्टेशनजवळ एक महिला धावत्या ट्रेनमधून अचानक खाली पडली. त्यामुळे महिलेच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डबा गेला.
या घटनेत महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटल्याची माहिती आहे. घटनेनंतर रेल्वेस्थानकात मोठा गोंधळ उडाला. प्रवाशांनी या घटनेची माहिती तातडीने रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
सध्या ही महिला गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर ओसरला असून लोकलसेवा पूर्वपदावर येत आहेत.
त्यामुळे प्रवाशांनी ट्रेनने प्रवास करताना घाईगरबड करू नये. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा तसेच उतरण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.