Schools Closed In KDMC Saam Tv
मुंबई/पुणे

School Holiday: सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, KDMC चा मोठा निर्णय

Schools Closed In KDMC: हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Priya More
  • ठाणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला

  • केडीएमसीने ४ जुलै रोजी सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली

  • अतिवृष्टी, पूरस्थिती आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून निर्णय

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. पुढचे दोन दिवस राज्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी ४ जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला. शनिवार ४ जुलै २०२६ रोजी केडीएमसी हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि घरामध्येच सुरक्षित राहण्याचे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ ते ३ जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट, ४ जुलै रोजी रेड अलर्ट आणि ५ जुलै रोजी पुन्हा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत अतिवृष्टी, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, काही ठिकाणी पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे तसेच वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केडीएमसी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

शाळा- महाविद्यालयांना सुट्टी हा आदेश राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, सीआयई आदी सर्व बोर्डांच्या तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा व महाविद्यालयांना लागू असणार आहे. याशिवाय, पुढील काही दिवस हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देशही शिक्षण विभागाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT