Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा, गरज असल्यासच घराबाहेर पडा

Mumbai Heavy Rain: मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा परिणाम लोकलसेवेवर झाला आहे.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईसाठी पुढचे काही तास महत्वाचे असणार आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. मुंबईतील अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे. आज काही भागात रेड अलर्टही पावसाचा जारी करण्यात आला. हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. रायगड आणि पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com