School Timing: मोठी बातमी! शाळाच्या वेळेत बदल; पुणे महापालिकेनं का घेतला निर्णय?

Pune Corporation Change School Timing: पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी प्राथमिक शाळांच्या वेळांमध्ये बदल केला आहे.
Pune Corporation Change School Timing
Pune School Timings Changed: Pmc Announces New Schedule For Primary Schools Until August 31saam tv
Published On
Summary
  • पुणे महापालिकेने १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल केला आहे.

  • हा निर्णय मनपा आणि खासगी प्राथमिक शाळांसाठी लागू करण्यात आला आहे.

  • SIR साठी शिक्षकांची नियुक्ती होत असल्याने हा बदल करण्यात आला आहे.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचदरम्यान आता पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेत मोठा बदल केलाय. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. (Pune School Timings Changed: Pmc Announces New Schedule For Primary Schools Until August 31)

Pune Corporation Change School Timing
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा,अंगणवाडी आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुलांची झोप पूर्ण व्हावी यामुळे सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना मागच्या वर्षी तत्कालीम राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानंतर शाळेच्या वेळेत बदल करण्यात आले होते. मात्र आत्ता सर्वत्र पाऊस सुरू झालाय. त्यात पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या SIR च्या मोहिमेच्या कामासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, मनपा आणि खासगी प्राथमिक शाळांच्या वेळेत मोठा बदल केला गेला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुर्ननिरीक्षण मोहिमेच्या कामासाठी शिक्षकांना वेळ उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, या दुहेरी उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत शाळा आता सकाळी ७.०० ते दुपारी १२.१५ पर्यंत असणार आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे आणि उप आयुक्त वसुंधरा बारवे यांनी सर्व मनपा व खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना कडक निर्देश दिले आहेत की, शाळांच्या वेळेत झालेल्या या तात्पुरत्या बदलाची माहिती तातडीने पालकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. हा बदल ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ रोजी महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक आणि दोषविरहित करण्यासाठी शिक्षकांची भूमिका 'मतदान केंद्रस्तरीय अधिकारी' म्हणून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Pune Corporation Change School Timing
Weather Update: महाराष्ट्रासह २३ राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

शिक्षकांना संपूर्ण वेळेसाठी बीएलओ म्हणून नियुक्त न करता, त्यांना सुट्टीच्या दिवशी आणि शाळा सुटल्यानंतर शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर हे राष्ट्रीय काम करता यावे, यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ घेऊन आणि अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने शाळांच्या वेळेत हा बदल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com