पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा,अंगणवाडी आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Palghar School Holiday : IMD ने अति मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केल्यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून पालघर जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
Palghar School Holiday
Palghar Declares Holiday For Schools, Colleges And Anganwadis As IMD Issues Red Alert
Published On
Summary
  • भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

  • खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर

  • जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी याबाबत अधिकृत आदेश जारी

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

पालघर जिल्ह्याला उद्या हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय तसेच अंगणवाडी यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनि त्या प्रकारचा आदेश काढून सुट्टी जाहीर केलीय. (Palghar Declares Holiday For Schools, Colleges And Anganwadis As IMD Issues Red Alert)

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 02.07.2026 रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. आजही संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

Palghar School Holiday
Weather Update: महाराष्ट्रासह २३ राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 02.07.2026 रोजी सुट्टी जाहिर करीत आहे. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com