Sanjay Raut On CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : हप्ते गोळा करायचे अन् दिल्ली चरणी वाहायचे; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार, सगळा इतिहासच काढला! VIDEO

Sanjay Raut on eknath shinde : मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीच्या चरणी वाहायचे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हप्त्यावरून केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.'राज्यातून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीच्या चरणी वाहायचे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी बदलापुरात पूर्वीचे सरकार हप्ता गोळा करणारे होते, तर आताचे सरकार महिला, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारे असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.

'ज्यांचं पूर्ण आयुष्य संपूर्ण आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोसलं गेलं. हप्तेबाजी, ठेकेदारी हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र राहीलं. आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे. इथून हप्ते गोळा करायचे, इथून थैल्या गोळा करायच्या. त्यानंतर त्या थैल्या दिल्लीच्या चरणी वाहायच्या. आपलं मुख्यमंत्रिपद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल या महाराष्ट्राने आणि आम्ही काय बोलायचं, असं बोलत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

'50-50 कोटी आणि 100-100 कोटीला आमदार खासदार विकत घेतात. नगरसेवक विकत घेतात. न्याय विकत घेतात. कायदा विकत घेतात हे हप्तेबाजीवर होतं, हे कष्टाच्या पैशांवर होत नाही, अशी टीकाही राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, 'लाडकी बहीणीचा प्रचारक नसून हा त्यांच्या निवडणुकीचा प्रचार आहे. तो जनतेच्या पैशांनी होत आहे. यालाच हप्तेबाजी म्हणतात. सरकारी तिजोरीतून हप्तेबाजी सुरू आहे. हे राज्याच्या इतिहासात प्रथम होत आहे. जनतेच्या कराच्या पैशांतून इतकी मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होत आहे'.

'लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात मोदी-शहा यांचा पराभव झाला. महविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहे. आज महाविकास आघाडीचा मेळावा आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते असणार आहेत. मेळाव्यात पाहिले भाषण उद्धव ठाकरे करतील. तीन पक्षात समानता आहे. जागा वाटपाबाबत मतभिन्नता नाही. शिवसेना प्रमुख दिल्लीत होते, त्यावेळी शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या सोबत बैठका झाल्या. आज आम्ही रणशिंग फुंकतो आहे. आज सुरुवात होईल, यानंतर पुढील 3 महिन्यात एकत्रित प्रचार आम्ही करू, अशी माहिती राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

Women Investment Tips: कमी गुंतवणूक अन् जास्त फायदा, महिलांसाठी पैसे गुंतवणूकीच्या या 5 बेस्ट स्कीम

Viral Video : बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT