Maharashtra Politics : संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडली; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Amol Mitkari Criticized Sanjay Raut Over Thackeray and Sharad Pawar Family Split : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आलीय. संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केलाय.
संजय राऊत
Amol Mitkari Criticized Sanjay Raut Saam Tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय. मिटकरी अकोला येथे बोलत होते. आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय. त्यावर पलटवार करताना आमदार मिटकरी यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेत.

अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप

सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Group) यांना राखी बांधणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले होते. सुप्रिया सुळे यांच्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा होता. त्यामुळे अजित पवारांसंदर्भात त्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्रात लक्ष असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. यावर मिटकरींनी पलटवार केलाय.

पवार आणि ठाकरे गटात फूट

दरम्यान, पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय? असा सवालही यावेळी आमदार मिटकरी यांनी केलाय. दरम्यान पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा, असं संजय राऊत यांना कधीच वाटू शकणार नाही असंही मिटकरी (Amol Mitkari) म्हटले आहेत.

दरम्यान, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी परत एकदा जोरदार टीका केलीये. उद्या विखे पाटील स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाला अकोल्यात येणार (Maharashtra Politics) नाहीये. विखे पाटलांसाठी अकोला जिल्हा हा 'लाडका जिल्हा' नाही का? असा सवाल त्यांनी विखे पाटलांना केलाय. अकोला जिल्हा विखे पाटलांसाठी 'सावत्र जिल्हा' झालाय का? असा सवाल आमदार मिटकरींनी विखे पाटीलांना केला आहे.

संजय राऊत
Sanjay Raut: 1500 रुपये देतोय मतं द्या,नाहीतर...लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर कडाडले

टीका करणाऱ्यांना दुसरा उद्योग नाहीये, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. संजय राऊत (Sanjay Raut) बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक वर्ष काढले. अनेक नेते त्यांच्यामुळे पक्ष सोडून गेलेत. मनसेसारखा पक्ष विभक्त झाला, याला कारणीभूत फक्त राऊत असल्याचं मिटकरींनी म्हटलंय .

संजय राऊत
Sanjay Raut News : महाराष्ट्रात दोन नेते हस्तक, एक राज ठाकरे तर दुसरे...; संजय राऊतांचा घणाघात, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com