Union Home Minister Amit Shah Visit Lalbagcha Raja:  Saamtv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: 'भाजपचं व्यापारी मंडळ काहीही करेल', अमित शहांच्या दौऱ्यावरुन राऊतांचा टोला; CM शिंदेंवरही तोफ डागली!

Sanjay Raut Latest News: मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या. त्यांनी शिवसेना त्यासाठीच तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यासाठीच तोडली, म्हणून आम्हाला भिती वाटते," असे संजय राऊत म्हणाले.

Gangappa Pujari

मयुर राणे, मुंबई|ता. ९ सप्टेंबर

Sanjay Raut On Amit Shah Mumbai Visit: 'एक दिवस मुंबईमधील लालबागचा राजाही एक दिवस गुजरातला घेऊन जातील, अशी मला भीती वाटतेय,' असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेवरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांनी लालबागच्या राजाचा अपमान केल्याचे म्हणत माफीची मागणी केली होती. भाजपच्या या आरोपानंतर आता संजय राऊत यांनीही सडेतोड उत्तर दिले असून छत्रपती शिवरायांचा अपमान होत असताना फडणवीस यांनी माफी मागितली का? असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"गेल्या तीन चार पाच वर्षांमध्ये मुंबईच्या मराठी माणसाचा, आमचा दैवताचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याबद्दल फडणवीस यांनी माफी मागितली आहे का? आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीने भाजपचे गुजराती व्यापारी मंडळ महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करत आहे. मुंबई ओरबाडण्याचा एक डाव सुरू आहे. मुंबईतल्या सर्व उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातला नेल्या. त्यांनी शिवसेना त्यासाठीच तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्यासाठीच तोडली, म्हणून आम्हाला भिती वाटते," असे संजय राऊत म्हणाले.

अमित शहांवर टीकास्त्र

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेची मुंबई व्हायला पाहिजे, पाट्या मराठीत व्हायला पाहिजे यासाठी आंदोलन केली. काही इतर पक्षातील सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला, अनेक लोक या लढाईत होते. आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेचे मुंबई केले हे सांगता लोक काय विश्वास ठेवतील? आणि भारतीय जनता पक्षाची लोक टाळ्या वाजवतात मुर्खासारखे. जेव्हा जेव्हा मुंबईवर अशा प्रकारचा हल्ला होईल तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे. आमच्यामध्ये अजूनही मुंबई मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे," असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

CM शिंदे, अजित पवारांवर निशाणा!

अमित शहा हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नेते आहेत आणि त्यांचे नेते आता गुजरातमधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटत असतील. पूर्वी अजित पवार यांचे नेते माननीय शरद पवार होते, तेव्हा त्यांच्या मुंबईत किंवा बारामतीत हायकमांडच्या भेटी व्हायच्या. एकनाथ शिंदे यांचे नेते बाळासाहेब ठाकरे किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्या मुंबईत त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ येथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रात एक दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावच लागत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT