Ajit Pawar: 'कुटुंब सोडणं माझी चूक', अजित पवारांची जाहीर कबुली; घर फुटू न देण्याचा पक्षातील नेत्यांना सल्ला

Maharashtra Politics : 'कुटुंब सोडणं माझी चूक', असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
'कुटुंब सोडणं माझी चूक', अजित पवारांची जाहीर कबुली; घर फुटू न देण्याचा पक्षातील नेत्यांना सल्ला
Sharad Pawar And Ajit PawarSaam TV
Published On

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतायत तसतसे नवनवे मुद्दे चर्चेला येतायत. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून केलेल्या विधानामुळे महायुतीतली धुसफूस समोर आली होती. तो वाद शमत नाही तोवर अजित पवारांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात एक चूक झाल्या फार मोठी कबुली दिली. ही कबुली म्हणजे शरद पवारांची साथ सोडण्याची.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम - हलगेकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पडल्याच्या अनुभवाचं जाहीररित्या कथन केलं.

'कुटुंब सोडणं माझी चूक', अजित पवारांची जाहीर कबुली; घर फुटू न देण्याचा पक्षातील नेत्यांना सल्ला
Maharashtra Politics : शिंदे गटाचा 120 जागांवर दावा, अजित पवार गटाने केली इतक्या जागांची मागणी; भाजपची भूमिका काय?

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, ''तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा. वडिलांचं जितकं प्रेम लेकीचं असतं, तितकं कोणीच करू शकत नाही. असं असताना घरात फूट पाडण्याचं प्रयत्न करत आहेत. हे बरोबर नाही. समाजाला ते आवडत नाही. मीही याच अनुभव घेतला आहे. मी माझी चूक मान्य केली.''

तर दादांच्या या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालं. दादांनी घर फुटू नये असा सल्ला दिला खरा. मात्र ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही ते अजून माहित नाही असा जोरदार टोला जयंत पाटलांनी दादांना लगावलाय. तर ही पक्ष फोडण्यापूर्वी ही सदबुद्दी आली असती तर आता पश्चातापाची वेळ नसती आली अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

'कुटुंब सोडणं माझी चूक', अजित पवारांची जाहीर कबुली; घर फुटू न देण्याचा पक्षातील नेत्यांना सल्ला
Pooja Khedkar Dismissed : मोठी बातमी! IAS पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बडतर्फ; केंद्र सरकारची मोठी कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं. एवढंच नव्हे तर बारामतीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांनाही पवारांवर टीका करण्यापासून रोखलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी थेट पवारांना सोडणं चूक झाल्याची कबुलीच जाहिररित्या दिलीय. त्यामुळे अजित पवारांना खरंच पश्चाताप होतोय की निवडणुकीच्या रणनीतीचा हा भाग आहे याबाबत त्यांच्या मित्र पक्षांना आणि जनतेला प्रश्न पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com