Sanjay Raut Criticized PM Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Video: मुंबईचा पैसा गुजरातला जातोय, गुजरात पासिंग बसवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Priya More

टीम इंडियाच्या विजय रॅलीसाठी गुजरातवरून बस मागवण्यात आल्यामुळे विरोधक महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करत आहे. गुजरातवरून बस आणून महाराष्ट्राचा अवमान केला जात असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील यावरून मोदी सरकारसोबत महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे असं तुम्ही दाखवत आहात का?', असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, 'मुंबईचा पैसा लुटून गुजरातला घेऊन जात आहेत.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान भारताच्या क्रिकेट टीमला भेटू शकतात. जिथे उत्साह असतो, आनंद असतो तिथे पंतप्रधान जातात. आपल्या निवासस्थानी बोलावतात. जसं की ती ट्रॉफी त्यांनी जिंकली आहे असं ते दाखवतात. पण जिथे लोकं संकटात आहेत तिथे ते जात नाही. मणिपूर, हाथरससारख्या ठिकाणी पीएम मोदी जात नाही. भारतीय टीमला भेटण्यासाठी त्यांना वेळ आहे. ज्या राज्यातून तुम्ही जिंकून आला आहेत. त्या राज्यात मोठी दुर्घटना घडली तरी देखील तुम्ही तिकडे गेले नाहीत.'

टीम इंडियाच्या रॅलीसाठी गुजरातवरून बस आणल्यामुळे संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'हा महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. याआधी वर्ल्ड कप जिंकून भारताची टीम मुंबईत आली होती तेव्हा इकडचेच बसेस आणि गाड्यांचा वापर करण्यात आला होता. मुंबईत जल्लोष होता. पण हा देशाला दाखवण्याचा प्रयत्न आहे की सर्वकाही गुजरात आहे. आम्ही आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहेत. पण हे जास्त दिवस चालू शकणार नाही. मुंबईतही मोठ मोठ्या बसेस आहेत. बेस्टच्या बसेस आहेत. महाराष्ट्र सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. मुंबईत काय नाही आहे. आमच्याकडूनच तुम्ही शिकला ना?', असा सवाल करत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'गुजरातवरून बस आणण्यावर क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे होते. तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना या वेदना झाल्या पाहिजे होत्या. त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणीवरती अनेक मराठी लोकं आहेत. त्यात शिवसेनेची ही लोकं आहेत. त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे होता. रोहित शर्मा हा मुंबईला क्रिकेटपटू आहे. बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत. मुंबई इंडियन्सचे आहेत. पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही काय दाखवत आहात. मुंबईत बेस्टच्या बसेस आहेत. त्या नसत्या तर एका रात्रीमध्ये बस बनवून घेतली असती ऐवढी मुंबईची क्षमता आहे.'

संजय राऊत यांनी यावेळी मुंबईचा पैसा लुटून गुजरातला जात असल्याची टीका केली. त्यांनी सांगितले की, 'खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली. म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे असं तुम्ही दाखवत आहात का? मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत सर्वकाही आहे. मुंबईतलाच पैसा गुजरातला जात आहे. इथूनच लूट होत आहे आणि तिकडे पैसा जात आहे. त्याच्यामुळे एक बस आली त्यामुळे काही फरक दिसत नाही पण एक वृत्ती दिसत आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli : निक्कीला फुल्ल सपोर्ट करा, बिग बॉसची ट्रॉफी आपलीच; नंदुरबारकरांनी काढली मिरवणूक

Maharashtra Politics : आमदार रोहित पवारांचा नवा डाव; चुलत्यावर टीका तर पुतण्याबरोबर गुप्तगू

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! आजच बँक खातं तपासा; लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पुन्हा ३००० रुपये जमा

Vande Bharat Train : वंदे भारत, राजधानी, शताब्दीपेक्षा 'या'ट्रेनचं भाडे दीडपट जास्त

Assembly Election: विधानसभा निवडणुकांनंतर NDAला हादरा! नितीश कुमार देणार 'जोर का झटका', नेमकं राजकारण काय?

SCROLL FOR NEXT