sambhaji bhide  saam tv
मुंबई/पुणे

कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो, 'साम'च्या महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Sambhaji Bhide News : संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले संभाजी भिडे यांनी साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी कपाळावर टिकली लावलीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, लोकशाही प्रत्येकाला सवच्छेने राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे. मात्र, त्यांच्या विपरित भुमिकेमुळे संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहेत.

'आमची भावना आहे की, स्त्री भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही. त्यामुळे कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असं मत संभाजी भिडे गुरूजींनी मांडले. संभाजी भिडेंच्या भुमिकेमुळे ते पुन्हा अडचणीत आले आहेत. भिडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेत आले आहेत.

काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'सदर बाब आश्चर्य वाटण्यासारखी आहे. जी लोक मनुवादी आहेत. जे महिलांचा सन्मान करत नाहीत. त्यांनी नेहमी अंधश्रद्धा समोर आणलेली आहे. 'आंबे खाऊन पुत्र प्राप्ती होईल', असा प्रचार-प्रचार करणारे मंडळी आहेत. यांची कीव येत आहे'.

'आज जग कुठं चाललं आहे ? हे कशावर बोलत आहेत ? महिलांचा मान-सन्मान यांचा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव समोर करतात. सातत्याने वादग्रस्त विधान करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन 'आरएसएस'चा अजेंडा ही लोक चालवतात. या घटनेचा निषेध मी निषेध करते, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Diwali Faral : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT