महिलांना अशी वागणूक सामाजिक विकृती; महिला आयोग 'त्या' वक्तव्याबाबत संभाजी भिडेंना नोटीस पाठवणार

टिकलीवरुन महिलेचं पद ठरवणं हे चुकीचं आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSaam TV
Published On

मुंबई : कुठल्याही महिलेचं कर्तृत्व तिच्या टिकलीवरुन ठरत नाही. संभाजी भिडे यांचं वक्तव्य निषेधार्य आहेत. राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना आजच नोटीस पाठवणार असल्याचं राज्य महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

संभाजी भिडे यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. टिकलीवरुन महिलेचं पद ठरवणं हे चुकीचं आहे. ही समाजाची विकृती आहे. महिलांना दुय्यक लेखणं ही विकृती नष्ट करायचं आहे. महिलेचं कर्तृत्व तिच्या टिकलीवरुन ठरत नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासा करावा याबाबत त्यांना नोटीस पाठवली जाईल, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

Sambhaji Bhide
कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो, 'साम'च्या महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

नेमकं काय घडलं?

संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित साम टीव्हीच्या पत्रकार रुपली बडवे यांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Sambhaji Bhide
Sanjay Raut Meet Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी, संजय राऊत वर्षा बंगल्यावर दाखल

आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी कपाळावर कंकू लावलाच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. "तू कुंकू लाव मग तुझ्याशी बोलेल. प्रत्येक स्त्री भारतमातेचं रुप असतं असं आम्ही मानतो. आणि भारतमाता विधवा नाही. तू कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो", असं संभाजी भिडे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com