गोंदिया : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघड़ले असुन पटोले यांना औषध उपचाराची गरज असल्याच्या खोचक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी लगावला आहे. ते (Gondia) गोंदियात बोलत होते. (Maharashtra News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी योगा संदर्भात महात्मा गांधी यांची कॉपी करून तत्वाचे भांडवल केले असे वक्तव्य नाना पटोले (Nana Patole) यांनी केले होते. त्याच्या चांगलाच समाचार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. नाना प्रसिद्धीसाठी असे करीत असल्याच्या पलटवार देखील विखेपाटील यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंना खुप शिकायचे
आदित्य ठाकरेंना खुप काही शिकायचे आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, असे परखड़ मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांनी भाजप शिंदे सरकारच्या बसलेल्या कानठळ्या आदित्य ठाकरे उठवणार; असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले होते. त्यावर पाटील बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी कोणाला सल्ला देउ नये. मी आंबदास दानवे यांना कोणताही सल्ला देणाऱ नाही. सध्या त्यांचे कोणीही ऐकत नसल्याने दानवे असे वक्तव्य करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.