Salman Khan inaugurates SRA’s IT server room and distributes house keys to beneficiaries in Mumbai. saam tv
मुंबई/पुणे

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

Salman Khan SRA Mumbai Visit Full Details: बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांनी मुंबईतील एसआरए कार्यालयाला भेट देत अत्याधुनिक आयटी सर्व्हर रूमचे उद्घाटन केले आणि ५० हून अधिक झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या वितरित केल्या.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांनी शुक्रवारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) बृहन्मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट देत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या वेळी त्यांनी एसआरएच्या तंत्रज्ञानाधिष्ठित, पारदर्शक आणि नागरिककेंद्री कामकाजाचे कौतुक केले.

भेटीदरम्यान सलमान खान यांच्या हस्ते एसआरएच्या विदा संकलन व पृथक्करण सहायता कक्षातील (IT Server Room) अत्याधुनिक आयटी सर्व्हर रूमचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल प्रशासन अधिक सक्षम, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेली ही सुविधा एसआरएच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमांना अधिक गती देणार आहे. याच कार्यक्रमात एसआरएच्या कार्याचा आढावा, पुनर्वसनाच्या यशोगाथा, विविध विकास प्रकल्प आणि संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या एसआरए कॉफी टेबल बुकचेही सलमान खान यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रकाशनाच्या माध्यमातून एसआरएच्या कार्याची व्यापक माहिती नागरिक आणि विविध हितधारकांपर्यंत पोहोचणार आहे.

एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत सलमान खान यांनी ५० हून अधिक पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मिळालेल्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण केले. स्वतःच्या घराची चावी स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.यावेळी लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासन आणि एसआरएचे आभार मानत पुनर्वसन प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त केले.

या सदिच्छा भेटीमुळे एसआरएच्या नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यप्रणालीला नवी ओळख मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाला एसआरएचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

Warkari Accident: वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात; सातारा-पुसेगाव रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर धडक

Sir Garfield Sobers : क्रिकेट विश्वावर शोककळा; महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांचं निधन

E-20 वापरा, नवीन गाडी मिळवा, इथेनॉलमुळे 10 पैकी 4 गाड्यांमध्ये बिघाड

सरकारचा लाडकीला आणखी एक धक्का, लाडकींची मोफत साडी योजना बंद

SCROLL FOR NEXT