इंडिया आघाडी नेते आणि शरद पवारांमध्ये ४०मिनिटे चर्चा! काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश? राहुल गांधींच्या थंबचा अर्थ काय?

INDIA Bloc Leaders Meet Sharad Pawar: डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. ४० मिनिटांच्या चर्चेनंतर राहुल गांधींनी दाखवलेल्या थम्ब्सअपमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Sharad Pawar Meets India Bloc Leaders | Rahul Gandhi's Thumbs-up Sparks Buzz
Sharad Pawar Meets India Bloc Leaders | Rahul Gandhi's Thumbs-up Sparks Buzzsaam tv
Published On: 
Summary
  • डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय घडामोडींना वेग

  • राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट

  • मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ही बैठक पार पडली.

डिलिमिटेशनवरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. एम. के. स्टॉलिन यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. इंडिआ आघाडीचे नेते आणि शरद पवार यांची भेट ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ही बैठक झाली. ही बैठक तब्बल ४० मिनिटे चालली. चर्चा पूर्ण होताच इंडिया आघाडीचे नेते हॉस्पिलमधून बाहेर पडले. त्यामुळे राहुल गांधींनी माध्यमांना थंब दाखवलाय.

त्यामुळे ही चर्चा सकारात्मक झाली का? शरद पवार काय भुमिका घेणार? इंडिया आघाडीकडून करण्यात आलेली शरद पवारांची मनधरणी ही यशस्वी ठरली का? असे प्रश्न अनेकांना पडलेत. बैठकीनंतर कोणताही अधिकृत निर्णय किंवा ठोस अपडेट समोर आलेला नाही. शरद पवारांच्या भेटीनंतर इंडिया आघाडीचे नेते रुग्णालयातून बाहेर पडले. या बैठकीत नेमकं काय घडलं आणि पवारांच्या भूमिकेत बदल होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते मुंबईत दाखल झाले होते. शरद पवार यांच्या भेटीआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, डिलिमिटेशनला विरोध हा देश वाचवण्याचा लढा असून तो अखेरपर्यंत लढू. आमचा प्रयत्न हा या देशातील लोकशाही वाचवण्याचा, या देशाला अराजकतेपासून वाचवण्याचा आहे. सध्याच्या सरकारला डिलिमिटेशनच्या माध्यमातून कायमस्वरुपी सत्तेत बसायचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.