निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का! ९३ नेते अन् कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

Mass Resignation in Manipur BJP: मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. खुंड्राकपम युनिटमधील ९३ पदाधिकारी आणि सक्रिय सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
Manipur Bjp Crisis: 93 Leaders And Workers Resign Ahead Of Elections
Manipur Bjp Crisis: 93 Leaders And Workers Resign Ahead Of Electionssaam tv
Published On: 
Summary
  • भाजपला मोठा संघटनात्मक धक्का बसला आहे

  • खुंड्राकपम युनिटमधील ९३ जणांनी राजीनामे दिले

  • सामूहिक राजीनाम्यानंतर खुंड्राकपम युनिट बरखास्त करण्याचा निर्णय

विधानसभा निवडणुकीआधी मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय.भाजपच्या खुंड्राकपम (Khundrakpam) युनिटमधील ९३ पदाधिकारी आणि सक्रिय सदस्यांनी एकामागून एक राजीनाने देत पक्ष सोडलाय. युनिटचे अध्यक्ष एम. देवरतन मैतेई यांनी राज्य नेतृत्व आणि सरकारवर दुर्लक्ष केल्याचा तसेच सहकार्य न केल्याचा आरोप केलाय. या सदस्यांनी हे युनिट बरखास्त करण्याचाही निर्णय घेतलाय. काँग्रेसने या घटनेला भाजपमधील वाढत्या असंतोषाचे लक्षण असल्याचे म्हटलंय.

Manipur Bjp Crisis: 93 Leaders And Workers Resign Ahead Of Elections
इंडिया आघाडीचे नेते आणि शरद पवारांमध्ये ४०मिनिटे चर्चा! काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश? राहुल गांधींच्या थंबचा अर्थ काय?

मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुंड्राकपम विभागात ९३ नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिलाय. राजीनामा दिलेल्यांमध्ये विभागीय पदाधिकारी तसेच सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. त्या सर्वांनी पक्षाच्या कामकाजापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी विभागीय घटक बरखास्त केल्याची घोषणाही केलीय.तसेच स्थानिक पक्ष नेतृत्वाने राज्य नेतृत्व आणि सरकारवर त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय.

खुंड्राकपम मंडळाचे अध्यक्ष एम. देवरतन मैतेई यांनी रविवारी इम्फाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, मंडळाचे ९३ सक्रिय सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. या सर्वांनी भाजपच्या कामकाजापासून स्वतःला पूर्णपणे वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Manipur Bjp Crisis: 93 Leaders And Workers Resign Ahead Of Elections
केंद्र सरकारचा मोठा विजय! खासदार-आमदारांच्या संख्या वाढीच्या निर्णयाला कट्टर विरोधकाचा पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मंडल अध्यक्ष देवरतन मैतेई यांनी सांगितले की, मंडल युनिट बरखास्त करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, राज्य नेतृत्व आणि सरकारने त्यांच्याद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष दिले नाही. याव्यतिरिक्त, पक्ष नेतृत्वाकडूनही कोणताही पाठिंबा मिळाला नाही. मात्र, मंडल युनिटने नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले होते, याचा उल्लेख त्यांनी केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.