

सॉरी मम्मी-पप्पा असं वहीत लिहून १७ वर्षीय मुलीनं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुण्यातील धनकवडी परिसरात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी सहकार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तिचा मोबाइल, वह्या-पुस्तके ताब्यात घेतली असून, तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिद्धी केडिया असं या मुलीचं नाव आहे. रिद्धी बारावी इयत्तेत शिकत होती. गुरुवारी पहाटे तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या वहीत सॉरी मम्मी-पप्पा असे लिहेले होते. पोलिसांना घरात पाहणी करत असताना ती वही सापडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रिद्धी तिचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि आजीसह पुण्यातील धनकवडी परिसरात वास्तव्यास होती. इयत्ता बारावीत ती शिक्षण घेत होती. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ती तिच्या आजीजवळ झोपण्यासाठी गेली. पहाटे आजीला जाग आली. त्यावेळी शेजारी रिद्धी दिसून आली नाही.
आजीने तातडीने घरातील इतर सदस्यांना झोपेतून उठवले. तिचा घरात शोध घेतला. पण ती कुठेच दिसली नाही. कुटुंबीयांनी घराचा दरवाजा पाहिला असता तो आतून बंद असल्याने त्यांनी गॅलरीमध्ये जाऊन बघितले. तिथे त्यांना एक स्टूल ठेवलेला दिसून आला.
कुटुंबीयांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली. रिद्धी खाली निपचित पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या घरात तपासणी केली असता, रिद्धीच्या वहीमध्ये "सॉरी, मम्मी पप्पा" असा एका ओळीचा संदेश लिहून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी रिद्धीचा मोबाइल आणि वह्या, पुस्तके ताब्यात घेतली असून, तज्ज्ञांकडून तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.